शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ंएकता मंच पाच जागा लढविणार !

By admin | Updated: June 19, 2015 01:02 IST

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे समर्थक असल्यामुळे आम्ही भाजपसोबत युती केली आहे.

सुलेखा कुंभारे : स्वबळावर निवडणूक लढणार नाहीभंडारा : स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचे समर्थक असल्यामुळे आम्ही भाजपसोबत युती केली आहे. भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचने जिल्हा परिषदेच्या पाच जागा लढविणार असून त्यासंदर्भात पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरु आहे, अशी माहिती बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या अध्यक्ष अ‍ॅड.सुलेखा कुंभारे यांनी गुरुवारला आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी त्या म्हणाल्या, कामठी नगर परिषदेत बहुजन रिपब्लिकन एकता मंचचा अध्यक्ष तर भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे सांगून युती ही केवळ विदर्भ राज्याच्या समर्थनाकरीता असल्याचे स्पष्ट केले. एकता मंचने भाजपला पाच जागांचा प्रस्ताव दिला असून त्यासंदर्भात भाजपचे नेते ना.नितीन गडकरी, खासदार नाना पटोले यांच्याशी चर्चा सुरू आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात दादासाहेब कुंभारे यांचे कार्यक्षेत्र राहिले आहे. त्यांनी बीडी कामगारांना न्याय दिल्याचे सांगून त्या म्हणाल्या, पेट्रोलपंप (ठाणा) या जिल्हा परिषद गटासाठी शशीकांत मेश्राम यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. युती धर्म पाळावा लागत असल्यामुळे अन्य जागासंदर्भात चर्चेतून तोडगा निघेल. पाच जागा कोणत्या या प्रश्नावर ते नंतर कळविण्यात येईल असे सांगून युतीमध्ये जागा वाटपात तोडगा निघाला नाही तर स्वबळावर निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी अ‍ॅड.प्रभात मिश्रा यांच्यासह पेट्रोलपंप ठाणा येथील कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)