शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकाच शिक्षकाचे पाचवेळा आदेश

By admin | Updated: March 17, 2017 00:26 IST

एका शिक्षकाची किमान पाच वेळा आदेश काढून जिल्हा परिषद प्रशासनाने विक्रम केला आहे. राजकीय

जि.प. प्रशासनाची तक्रार : नागपुरेंनी उपस्थित केला प्रश्न तुमसर : एका शिक्षकाची किमान पाच वेळा आदेश काढून जिल्हा परिषद प्रशासनाने विक्रम केला आहे. राजकीय दबावापोटी जिल्हा परिषद प्रशासनाने ही कारवाई केली, असा आरोप करून संबंधित शिक्षकाचे प्रकरण राज्याचे मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्र्याकडे लावून धरण्यात येईल, असा इशारा तुमसर पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे. जिल्हा परिषद शाळा परसवाडा (सि.) येथील पदवीधर शिक्षक ए.एम. हलमारे यांनी गैरवर्तणूक करून आपले कर्तव्यपालनात कसूर केल्याची तक्रार गटनेते हिरालाल नागपूरे यांनी केली होती. तुमसर पंचायत समितीच्या मासिक सभेत ठराव घेवून चौकशी करून कारवाई करण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. त्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यात पदवीधर शिक्षक ए.एम. हलमारे दोषी आढळले. संबंधित अहवाल भंडारा जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठविण्यात आला. ए.एम. हलमारे यांची प्रथम सिलेगाव सि. येथे बदली करण्यात आली. त्यानंतर लगेच सिलेगाव वरून पुन्हा परसवाडा सि. येथे स्थानांतरण करण्यात आले. तिसऱ्यांदा हलमारे यांना क्लिन चिट देण्यात आली. चवथ्यांदा जिल्हा परिषद प्रशासनाने पाचवेळा आदेश देवून विक्रम केला. सत्ताधारी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी दबाव आणून ही कारवाई करण्यास भाग पाडले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किमान नियमांचे भान ठेवून कारवाई करणे अपेक्षित होते. जिल्ह्यात ही कारवाई चर्चेची ठरली आहे. याप्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री यांची नागपुरात भेट घेवून सविस्तर माहिती आपण देणार असून त्याबरोबरच विभागीय आयुक्त तथा शिक्षण मंत्र्यांकडे रितसर तक्रार करणार आहे. या संपूर्ण बदली, क्लिन चिट, निलंबन कारवाईची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी सांगितले. नियमाचंी अवहेलना करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असे गटनेते नागपुरे यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)