शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
4
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
5
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
6
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
7
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
10
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
11
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
12
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
13
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
14
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
15
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
16
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
17
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
18
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
19
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
20
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

पाच किलो गांजा जप्त

By admin | Updated: March 11, 2017 00:21 IST

गोपनीय माहितीच्या आधारावर वाहनाची तपासणी करुन पाच किलो गांजा जप्त करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : तिघांना अटक, वाहनातून तस्करीभंडारा : गोपनीय माहितीच्या आधारावर वाहनाची तपासणी करुन पाच किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावर केली. शाकीर शकुर शेख (४७) रा. बाबा मस्तानशाह वॉर्ड भंडारा, अनमोल सुखदेव वाहाणे (३२) हनुमान वॉर्ड वरठी व विजय टिकाराम कटारे (४५) रा. कस्तुरबा गांधी वॉर्ड भंडारा असे अटक केलेल्या इसमांची नावे आहेत.माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर रात्रीच्या दरम्यान पेट्रोलींग करित असताना गोपनीय सुत्रांकडून माहिती मिळाली की नागपूरहून दोन ते तीन इसम चारचाकी वाहनातून गांजाची तस्करी करीत आहेत. याबाबतची माहिती तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक, आरसीसी पथक यांना देण्यात आली. यात शुक्रवारी पहाटे २.३० वाजतापासून भंडारा शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची चौकशी करण्यात आली. तपासणीदरम्यान एक चारचाकी वाहन वेगाने जात असल्याचा कारणाहून पोलीसाच्या शिताफीने वाहन पकडण्यात आले. सदर वाहन क्रमांक एम एच ३६ एफ २७४८ असा असून हिरव्यारंगाच्या स्कूल बॅगमध्ये अंदाजे पाच किलो गांजा मिळून आला. यावेळी सदर इसमाच्या ताब्यातून दोन मोबाईल संच, चिलम, रोख रक्कम व वाहन असा एकूण चार लक्ष ९६ हजार ६४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर वाहन व तीन्ही इसमाना अंमली पदार्थविरोधी पथकाने ताब्यात घेवून तिघांविरुध्द भंडारा पोलिसात कलम २२ (ब) एनडीटीएस अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपास सहायक पोलीस निरीक्षक सावने करीत आहेत. होळी सणाचा पर्वावर ही कारवाई करण्यात आली.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेश धुसर, नारायण सावने, पोलीस हवालदार कुंजलकर, रामटेके, आडे, राठोड, नागदिवे, साठवणे, घरडे, मेश्राम, पवार आदीनी सहभाग घेवून कामगिरी फत्ते केली. (प्रतिनिधी)