शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By admin | Updated: August 2, 2015 00:46 IST

पैशासाठी प्रीती पटेल यांचा खून व अश्विनी शिंदे या तरुणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सचिन राऊत (१९) आणि आमिर इजाज शेख रा.तकीया वॉर्ड ...

प्रकरण महिलेच्या खुनाचे : आणखी आरोपींचा शोध सुरूभंडारा : पैशासाठी प्रीती पटेल यांचा खून व अश्विनी शिंदे या तरुणीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या सचिन राऊत (१९) आणि आमिर इजाज शेख रा.तकीया वॉर्ड या दोन आरोपींना जिल्हा न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.राऊत व शेख या दोन आरोपींना प्रीती पटेल या महिलेचा निर्घृण खून केला तर अश्विनी शिंदे हिला बेदम मारहाण केली. यात प्रीतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अश्विनीवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. गुरुवारला दुपारी या दोन आरोपींनी रवींद्र शिंदे यांच्या घरात शिरून अश्विनीला बेदम मारहाण केली. त्यानंतर ती बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या घरून ऐवज चोरुन नेला होता. त्यानंतर रात्री ८ वाजता याच आरोपींनी समृद्धीनगरातील रुपेश पटेल यांच्या घरात प्रवेश करुन त्यांची पत्नी प्रीती पटेल यांचा खून करुन घरातील ऐवज लांबविला होता. भंडारा पोलिसांनी १२ तासात या आरोपींना अटक केली होती. (जिल्हा प्रतिनिधी)वकिलांनी नाकारले आरोपींचे वकीलपत्रभंडारा : हृदयाचा थरकाप उडवून देणाऱ्या प्रीती पटेल यांचा खून करणाऱ्या सचिन राऊत (१९) आणि आमिर इजाज शेख रा.तकीया वॉर्ड या दोन आरोपींचे वकिलपत्र घेण्यासाठी भंडारा जिल्हा बार असोसिएशनने नकार दिला आहे. यासंदर्भात बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.विनोद भोले यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला. त्या आशयाचे प्रसिद्धीपत्रही जारी केले आहे. या निवेदनावर सचिव राजन उके, उपाध्यक्ष एस.बी. चव्हाण, सहसचिव ए.ए. भुजाडे, कोषाध्यक्ष डी.ए. नखाते, सदस्य एम.टी. बेदरकर, के.एन. पालीया, ए.एम. खराबे, उल्का खडीक, आर.के. सक्सेना, व्ही.एम. दलाल, एम.एम. चव्हाण, डी.के. वानखेडे, व्ही.के. पशीने, के.एम. अंबादे, व्ही.के. स्वामी, निला नशिने, आरिफ खान, के.एन. बावनकर, कैलास भुरे, डी.डी. देवगडे या बार असोसिएशनच्या वकिलांची स्वाक्षरी आहे.