शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्यबीज संवर्धन केंद्र कुलूपबंद

By admin | Updated: April 1, 2017 00:42 IST

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा असून येथील गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते.

मासेमारांना जावे लागते परप्रांतात : पाणी व कर्मचाऱ्यांची वानवा, सदनिकाची दुर्दशामोहन भोयर तुमसरभंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा असून येथील गोड्या पाण्यात मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यात येते. मासेमारांना स्थानिक पातळीवर मत्स्यबीज उपलब्ध व्हावे म्हणून नागठाणा येथे मत्स्यबीज संवर्धन केंद्र सुरू करण्यात आले होते. सुमारे सात ते आठ वर्षापासून राज्य शासनाचे कोट्यवधींचे मत्स्यबीज केंद्र धुळखात पडून आहे. येथील साहित्याची नासधूस झाली असून काही साहित्य चोरीला गेले आहे. मनुष्यबळ तथा नियोजनाचा येथे अभाव आहे. तुमसर व मोहाडी तालुक्याच्या सीमेवर नागठाणा हे गाव आहे. गावाबाहेर राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून मत्स्यबीज केंद्र सुरू केले होते. सुरवातीला हे मत्स्यबीज केंद्र सुरळीत सुरू होते. मागील सात ते आठ वर्षापासून हे मत्स्यबीज केंद्र कायम कुलूपबंद आहे. येथील अनेक साहित्यांची चोरी झाली. फाटक चोरीला गेले आहे. मत्स्यबिजाचे सिमेंट टाक्यांची तोडफोड झाली आहे. येथे कर्मचाऱ्यांच्या चार सदनिका बांधल्या आहेत. त्यासुद्धा बेवारस पडून आहेत. १० ते १२ एकरात हे मत्स्यबिज संवर्धन केंद्र आहे. भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा आहे. या तलावात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोळी बांधव करतात त्यांना स्वस्त व दर्जेदार मत्स्यबीज सहज उपलब्ध व्हावे याकरिता नागठाणा येथे राज्य शासनाने मत्स्यबीज केंद्र सुरू केले होते. सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकाऱ्यांची येथे नियुक्ती करण्यात आली होती हे विशेष. भंडारा जिल्ह्यात दुसरे मत्स्यबीज संवर्धन केंद्र साकोली येथील शिवनीबांध जलाशयाजवळ आहे, परंतु भंडारा जिल्ह्याकरिता हे संवर्धन केंद्र मत्स्यबीज उपलब्ध करू शकत नाही. त्यामुळे मासेमार छत्तीसगढ तथा पश्चिम बंगाल येथून मत्स्यबीज खरेदी करण्याकरिता जातात. सर्वसामान्य मासेमारांना हे परवडणारे नाही. त्यामुळे मासेमारांना व्यवसाय करण्याकरिता अडचणी निर्माण होत आहे.नागठाणा येथे पेंच प्रकल्पातून पाणी उपलब्ध होते, परंतु मागील काही वर्षापासून पाणी उपलब्ध होत नाही, अशी माहिती आहे. येथे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. कोट्यवधींची इमारत व मत्स्यबीजाकरिता मोठे टाके तयार करण्यात आले. त्यांचीही नासधूस करण्यात आली आहे. राज्य शासनाने हे मत्स्यबीज संवर्धन केंद्र कुलूपबंद केले आहे. येथे मोठी ११ मत्स्यकुंभ तयार केले आहेत. मत्स्यबीज संवर्धन केंद्राकरिता अतिशय पोषक वातावरण आहे, परंतु शासनाने मत्स्यबीज संवर्धन केंद्र का बंद केले हा संशोधनाचा विषय आहे. शासनाने सदनिका व मत्स्यकुंभ देखरेखीखाली एक साधा चौकीदार येथे नियुक्त केला नाही. मत्स्यबीज संवर्धन केंद्र सुरू करण्यापूर्वी नियमानुसार जागा हस्तांतरण करून कोट्यवधींचा खर्च केला. नागठाणा येथील मत्स्यबीज संवर्धन केंद्राकरिता मुबलक पाण्याची आवश्यकता असून कर्मचाऱ्यांची कमतरता या कारणामुळे हे मत्स्यबीज संवर्धन केंद्र बंद आहे. येणाऱ्या काळात निश्चितच हे मत्स्यबीज संवर्धन केंद्र सुरू करण्यात येईल. शासन वरिष्ठ स्तरावर येथे निर्णय घेणार आहे.-विश्वंभर पसारकर, प्रभारी सहायक आयुक्त मत्स्यविभाग भंडारा.मागील सात आठ नाही तर १२ ते १५ वर्षापासून नागठाणा येथील मत्स्यबीज संवर्धन केंद्र बंद आहे. येथे पाण्याची सुविधा नाही. सदनिका शेवटच्या घटका मोजत आहेत. मासेमार बांधवांना परप्रांतातून मत्स्यबीज खरेदी करायला जावे लागते. हे दुर्देव आहे. -संजय केवट, माजी राष्ट्रीय मत्स्यबीज सहकारी संघ नवी दिल्ली.