शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीची ‘पिंजरा प्रणाली’ पद्धत अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:15 IST

तलावांचा जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ....

शिवणीबांध येथे एकमेव मत्स्यबीज केंद्र : संसाधनाअभावी मत्स्योत्पादनात जिल्हा माघारलालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तलावांचा जिल्हा असलेल्या भंडारा जिल्ह्यात मत्स्योत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या पिंजरा प्रणालीने मत्स्यपालन (केज कल्चर) योजनेला मासेमारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने ही योजना अयशस्वी ठरली आहे. परिणामी प्रचलित पद्धतीनुसारच मत्स्यपालन सुरू आहे. मत्स्यव्यवसाय विकास विभागाकडून वर्षाकाठी ७२ कोटी रूपयांचे १२ हजार मेट्रीक टन माशांचे उत्पादन होत आहे. यात १० हजारावर मासेमारांना लाभ होत आहे. भंडारा जिल्ह्यात सुरू केलेल्या ‘केज कल्चर’ या योजनेअंतर्गत विशिष्ट आकाराचे पिंजरे जलाशयात टाकून मत्स्य पालन करण्याची योजना आखण्यात आली होती. सन २०१४ मध्ये गोसेखुर्द प्रकल्पात एक पिंजरा टाकून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. परंतु त्यानंतर या पिजऱ्यांची संख्या वाढली नाही. जिल्ह्यात दोनशे हेक्टेर क्षेत्राच्या चांदपूर तलावात लावण्याजागे हे तीन-तीन लाख रूपये किंमतीचे पिंजरे ५० टक्के अनुदानावर देण्याचा प्रस्ताव मागविण्यात आला होता. परंतु मत्स्य सहकारी संस्थांकडून या योजनेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ही योजना अधांतरी राहिली.मत्स्य विकास विभागात तांत्रिक अधिकाऱ्यांचे मंजूर सहा पदांसह सहायक आयुक्त हे पद रिक्त आहे. पवनी, साकोली, तुमसर, भंडारा या ठिकाणी मत्स्योत्पादनाच्या दृष्टिने महत्वपूर्ण आहे. परंतु याठिकाणी सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी नाहीत. नागठाणा येथेही मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी हे पद खूप दिवसांपासून रिक्त आहे.तलाव तिथे मासोळीसाठी निधीमत्स्यव्यवसाय विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. यात मासेमारांसाठी ५० टक्के अनुदानावर नायलॉनचे जाळे आणि धागे उपलब्ध करून देण्याची योजना आहे. मत्स्य संस्थांना तत्त्कालिक खर्चासाठी मागणी करताच १० हजार रूपयांचे बिनब्याजी कर्ज दिले जाते. ते पाच वर्षांपर्यत फेडू शकतात. ‘केज कल्चर’च्या अपयशानंतर जिल्हा परिषदेने मालगुजारी तलावात ‘मत्स्यतळे’ विकसित करण्याची योजना आखली आहे. राज्य सरकारची ‘जिथे तलाव तिथे मासोळी’ योजनेला गती देण्यासाठी मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत दोन कोटी रूपयांच्या निधीची आवश्यकता नोंदविली असल्याचे सहायक आयुक्त (प्रभारी) वी. के. पसारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आतापर्यंत सहा कोटी मत्स्यबीज तयारभंडारा जिल्ह्यात सिंचन विभाग (राज्य) च्या अधिनस्थ येणाऱ्या ७२ आणि जिल्हा परिषदेच्या १,२०० तलावात दरवर्षी सरासरी १२ हजार मेट्रिक टन माशांचे उत्पादन होते. एकूण १२७ मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांच्या माध्यमातून नोंदणीकृत १० हजार मासेमार सुमारे ७२ कोटी रूपयांचा व्यवसाय करतात. यावर्षी या संस्थांना ३१ कोटी मत्स्यबीज निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले. २० जुलैपर्यंत सहा कोटी मत्स्य बीज निर्मिती झाली आहे. मत्स्यबीजासाठी शिवनीबांध येथे मत्स्यबीज केंद्र आहे. ज्यात पाच कोटी मत्स्यबीज उद्दिष्ठाच्या तुलनेत दोन कोटी मत्स्यबीज तयार करण्यात आले आहे.