शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

मत्स्य कंत्राटचे ८४ हजार देण्यास टाळाटाळ

By admin | Updated: October 19, 2015 00:48 IST

पालोरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने डोंगरदेव तलावाचा मत्स्य उत्पादनाचा ठेका प्रती किस्त ४२ हजार रुपये प्रमाणे ....

कारवाईची मागणी : अधिकाऱ्यांना निवेदनकरडी (पालोरा) : पालोरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने डोंगरदेव तलावाचा मत्स्य उत्पादनाचा ठेका प्रती किस्त ४२ हजार रुपये प्रमाणे पाच वर्षाकरिता लेंडेझरी (जांभोरा) येथील जय भोले मत्स्य पालन सहकारी संस्थेला दिला होता. तीन किस्त बरोबर दिल्यानंतर सदर संस्था दोन किस्तीचे ८४ हजार रुपये देण्यास वारंवार टाळाटाळ करीत आहे. प्रकरणी अनेकदा नोटीस देण्यात आली. मात्र नोटीस घेण्यासही नकार देत असल्याने कारवाई करण्याची मागणी पालोरा संस्थेनी केली आहे. निवेदन वरिष्ठ पदाधिकारी व अधिकाऱ्यांना दिले आहेत.मोहाडी तालुक्यातील पालोरा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला डोंगरदेव येथील पाणी वापर तलाव सलग्न आहे. त्याचबरोबर मागील वर्षी डोंगरदेव येथील विविध कार्यकारी सहकारी संस्था पालोरा येथील संस्थेत विलीन करण्यात आली आहे. पालोरा, खडकी, डोंगरदेव, बोंडे आदी गावे पालोरा संस्थेत समाविष्ठ आहेत. डोंगरदेव पाणी वाटप तलाव सलग्न असल्यामुळेच सदर तलावाचे मत्स्य उत्पादनाचा ठेका लेंडेझरी येथील जय भोले मत्स्य पालन सहकारी संस्थेला देण्यात आला होता. ठेका पाच वर्षाकरिता देण्यात आलेला होता. संस्थेला पाच वर्षाचा ठेका प्रती किस्त ४२ हजार रुपये याप्रमाणे पाच किस्तीमध्ये देण्यात आला होता. लेंडेझरी संस्थेने लीज ठेक्याची तीन वर्षाची रक्कम बरोबर दिली. परंतु उर्वरीत दोन किस्तीचा ठेका देण्यास टाळाटाळ करीत आहे. दोन किस्तीची एकूण ८४ हजार रुपये अजूनपर्यंत भरणा केलेली नाही.शासनाचे आदेशानुसार डोंगरदेव संस्था विलीन झाली असल्याने पालोरा येथील संस्था वारंवार संबंधित लिजची रक्कम भरण्यास सांगत असताना लेंडेझरी संस्था दुर्लक्ष करीत आहे. रक्कम भरण्यासंबंधी अनेकदा नोटीस व पत्रव्यवहार करण्यात आला. मात्र नोटीस घेण्यासही मत्स्य पालन संस्था लेंडेझरी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे सदर रक्कम मिळण्यासाठी पालोरा येथील संस्थेने सहाय्यक आयुक्त, मत्स्य पालन भंडारा यांना निवेदन दिले आहे. कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग, आमदार चरण वाघमारे, खंडविकास अधिकारी मोहाडी यांनाही कारवाईसाठी कळविण्यात आले आहे. (वार्ताहर)