शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधी लेखी परीक्षा, नंतर शारीरिक चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:18 IST

पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशी पद्धत होती. मात्र यावर्षीपासून भरती प्रक्रियेत बदल झाला असून आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. यात उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपोलीस भरती : उत्तीर्ण उमेदवारच शारीरिक चाचणीस पात्र

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पोलीस भरती प्रक्रियेत सुरुवातीला शारीरिक चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा अशी पद्धत होती. मात्र यावर्षीपासून भरती प्रक्रियेत बदल झाला असून आधी लेखी परीक्षा आणि नंतर शारीरिक चाचणी घेतली जाईल. यात उत्तीर्ण उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे.शासनाच्या गृह विभागाने पोलीस भरती प्रक्रियेत बदल केला आहे. त्या संदर्भातील आदेश निर्गमीत केले आहेत. पोलीस शिपाई पदावर बुद्धीमान उमेदवारांची निवड होण्यासाठी हा बदल केल्याचे सांगण्यात येत आहे. सुरुवातीला भरती प्रक्रियेत शारीरिक चाचणी घेतली जात होती. अनेकदा शारीरिक चाचणीत विद्यार्थी जखमी होत होते. तसेच १५ ते २० दिवस चालणाऱ्या या शारीरिक चाचणीमुळे लेखी परीक्षेचा अभ्यासही होत नव्हता. त्यामुळे अनेक जण पोलीस भरतीपासून वंचित राहात होते. हा प्रकार टाळण्यासाठी भरतीप्रक्रियेत सर्वप्रथम लेखी परीक्षा घेण्यात येईल. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारापैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाऱ्या पदांच्या प्रमाणात आवश्यक योग्य उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविण्यात येणार आहे. यामुळे भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरु न राहता जलद गतीने पार पडेल. यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांना जास्त वेळ ताटकळत राहावे लागणार नाही.पोलीस भरतीच्या जाहिरातीची उमेदवारांमध्ये प्रचंड उत्स्काता आहे. अनेक तरूण गत काही वर्षांपासून पोलीस भरतीची तयारी करीत आहे. पूर्वी शारीरिक चाचणी आधी घेतली जात असल्याने सर्व विद्यार्थ्यांचा भर शारीरिक कसरतीकडेच अधिक असायचा. दररोज व्यायाम करून पोलीस भरतीची तयारी केली जायची. परंतु लेखी परीक्षा पास झाल्यानंतरच शारीरिक चाचणी होणार असल्याने अनेक उमेदवारांचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.भरतीसाठी तरुणांची जय्यत तयारीपोलीस दलात भरती होण्यासाठी अनेक तरुण दोन ते तीन वर्षापासून परिश्रम करतात. शारीरिक कसरतीसोबतच लेखी परीक्षेचाही अभ्यास करतात. प्रत्येक शहरात पोलीस भरतीसाठी विशेष मार्गदर्शन वर्गही सुरु करण्यात आले आहेत. यामुळे योग्य उमेदवार पोलीस भरतीत यशस्वी ठरत आहे.