शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या पहिल्या शाळेला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा

By admin | Updated: January 12, 2017 00:24 IST

महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडेवाड्यातून मुलींची पहिली शाळा सुरु केली होती.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अखिल भारतीय माळी महासंघाची मागणीभंडारा : महात्मा ज्योतीबा फुले व सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडेवाड्यातून मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. या शाळेला शासनाने राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, अशी मागणी अखिल भारती माळी महासंघाने केली आहे. सन १ जानेवारी १९४८ रोजी फुले दाम्पत्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली होती. अंधारात खितपत पडलेल्या समाजाला शिक्षीत करुन देशाचा सर्वांगिण विकास घडविण्यासाठी यांनी प्रयत्न केले. ‘जिच्या हाती शिक्षणाची दोरी, ती देशाचा विकास करी’ या तत्वाप्रमाणे शिक्षणाला महत्व आहे. स्त्रि शिकली तर प्रत्येक माणूस घडेल आणि माणूस घडलातर देश विकसित होईल हे तत्व १६७ वर्षापुर्वी फुले दाम्पत्यांनी देशाला दिले. भिडेवाड्यातील शाळेची सुरुवात फुले दाम्पत्यांनी सुरु करुन महिलांना शिक्षणाचा प्रवाहात आणले. मात्र देशातील पहिल्या शाळेची सध्या दैनावस्था आहे. भिंती खचलेल्या असून पिल्लर गंजलेले आहेत. या इमारतीचा परिसर बकाल झाला आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख आहे. अशा शहरात ही वास्तु उभी असल्याने राज्य शासनाने या ऐतिहासिक वास्तुची जपणूक करावी या दृष्टीने या इमारतीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाच्या वेळी शिष्टमंडळात अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी, प्रकाश अटाळकर, शंकर राऊत, अंकोश बनकर, अ‍ॅड. रविभूषण भुसारी, अंबादास मंदूरकर, योगेस शेंडे, नितेश किरणापुरे, माधुरी देशकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)महिला रुग्णालयाला सावित्रीबार्इंचे नाव द्याभंडारा येथे महिला रुग्णालय प्रस्तावित आहे. या रुग्णालयाला सावित्रीबाई फुले महिला रुग्णालय असे नाव द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सामाजिक जनजागृती करुन राज्यात सामाजिक परिवर्तन करण्यात आले. अशा सावित्रीबाई फुलेंच्या नावाने रुग्णालय सुरु करावे अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.