शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आधी फुटपाथ व्यावसायिकांचे पुनर्वसन करा, नंतर अतिक्रमण हटवा

By admin | Updated: January 4, 2017 00:42 IST

स्मार्ट सीटी’च्या नावावर फेरीवाले आणि फुटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवून त्यांना बेरोजगार करण्यात येत असेल

सूर्यकांत ईलमे : अन्यथा ९ पासून आंदोलन करणार भंडारा : ‘स्मार्ट सीटी’च्या नावावर फेरीवाले आणि फुटपाथ व्यावसायिकांचे अतिक्रमण हटवून त्यांना बेरोजगार करण्यात येत असेल तर अशा ‘स्मार्ट सीटी’ला शिवसेनेचा विरोध राहील. आधी फेरीवाले व फुटपाथ व्यावसायिकांचे पुनर्वसन करा, अन्यथा ९ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कचेरीसमोर आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा शिवसेनेचे शहरप्रमुख सुर्यकांत ईलमे यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिला. यावेळी ईलमे म्हणाले, फुटपाथ व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या समस्या लक्षात घेऊन केंद्र सरकारने आदर्श पथ विक्रेता जिवीका संरक्षण व पथ विक्रय विनियम विधेयक २००९ तयार केला आहे. त्यामुळे आता शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन कारवाईपूर्वी ज्या ठिकाणी फुटपाथ विक्रेते व्यवसाय करीत होते, त्याच ठिकाणी त्यांचे पुनवर्सन करण्यात यावे, आखून दिलेल्या रेषेबाहेर कुणी अतिक्रमण करीत असेल तर कारवाई करावी, या विधेयकाअंतर्गत फेरीवाले आणि फुटपाथ विक्रेत्यांची नोंदणी करून समन्वय समिती तयार करण्यात यावी, या समितीच्या माध्यमातून फुटपाथ व्यावसायिकांच्या कार्यप्रणालीवर नियंत्रण ठेवण्यात यावे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, या विधेयकाअंतर्गत तत्कालीन जिल्हाधिकारी सच्चिंद्र प्रताप सिंह यांनी शहरामध्ये सर्वेक्षण केलेल्या सर्वेक्षणानंतर शहरात फेरीवाल्यांसाठी झोन तयार करण्यासाठी योजना आखली होती. परंतु त्यांची बदली झाल्यामुळे नंतरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी कोणताही पुढाकार घेतला नाही. त्यामुळे फुटपाथ व्यावसायिकांना नेहमी समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचा आरोपही ईलमे यांनी केला. (जिल्हा प्रतिनिधी)