शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

लोकवर्गणीतून साकारली पहिली ‘डिजिटल’ शाळा

By admin | Updated: January 6, 2016 00:42 IST

मनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी. खेड्यातील विद्यार्थ्यानेही शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी,....

लोकमत शुभ वर्तमान : बेला गावाने पटकाविला मान, मनोरंजनातून विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जनप्रशांत देसाई भंडारामनोरंजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी. खेड्यातील विद्यार्थ्यानेही शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी, त्यातून त्याचा बौध्दिक गुणांक विकसित व्हावा, या हेतूने शिक्षण समिती व शिक्षकांनी पुढाकार घेत, डिजीटल शाळेचे स्वप्न पूर्ण केले. जिल्ह्यात लोकवर्गणीतून डिजिटल शाळा साकारण्याचा पहिला बहुमान पटाविला बेला येथील जिल्हा परिषद शाळेने.लोकवर्गणीतून डिजिटल शाळा तयार करण्यासाठी शिक्षकांनी गावकऱ्यांची मदत घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गाढवे व मुख्याध्यापक यांनी ही शाळा डिजिटल बनविण्याचा चंग बांधला. परंतु ही बाब पाहिजे तेवढी सोपी नव्हती. यासाठी लाखो रूपये खर्च येणार होते. परंतु जिद्द, चिकाटी व कार्यात प्रामाणिकपणा असली की, कोणतेही काम अशक्य नसते. त्याचेच हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. २११ विद्यार्थी आणि सात शिक्षकांची ही शाळा असून या गावात शेतमजुर व शेतकरी कुटूंबाची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या ठिकाणावरुन लोकवर्गणी मिळविणे सोपे नव्हते. जिल्हा परिषदचे तत्कालीन अर्थ व शिक्षण व आरोग्य समिती सभापती तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय गाढवे व गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे सहकार्य व मार्गदर्शनाने ‘डिजीटल शाळा’ बनविण्याचा निर्धार अखेर सिद्धीस आला. यासाठी सर्वांना विश्वासात घ्यावे लागले. अडचणी आल्या. परंतु काम अखेर फत्ते झालेच. याचा सर्वात जास्त आनंद विद्यार्थ्यांना झाला. आता विद्यार्थी आवडीने अभ्यासात रमू लागले आहे. पालकांना मात्र आता त्याचे मोठे अप्रुप वाटत आहे.आपल्या मुलांसाठी शिक्षकांचे हे पाऊल प्रेरणादायी व प्रशंसनीय असल्याचे लक्षात आल्यावर बेला येथील नागरिकही सरसावले. त्यांनीही आपला खारीचा वाटा शाळेसाठी दिला. लोकसहभागातून तीन डिजीटल बोर्ड, प्रोजेक्टर, संगणक व सॉफ्टवेअर खरेदी केले. यासाठी तीन वर्गखोल्यांसाठी चार लाख रुपयांचा खर्च आला. ही सर्व रक्कम लोकसहभागातून जमा झाली. एवढेच नव्हे तर ज्यांची मुले शाळेत शिकत नाही, अशानींही स्वयंस्फुर्तीने योगदान दिले. त्यामुळे या उपक्रमाचे एका चळवळीमध्ये कधी रुपांतर झाले, हे कळलेच नाही. एखाद्या शिक्षण समिती अध्यक्षाने मनावर घेतले तर शाळेसाठी काहीही अशक्य नाही. त्याचेच प्रत्यंतर संजय गाढवे व शिक्षक कल्पना निंबार्ते, लता निचत, अनिल शहारे, किरण पाटील, अल्का खराबे, विद्या मेश्राम व संजय उपरिकर यांच्या कृतीतून बेला येथील शाळेत दिसून आलेला आहे.बेला ग्रामपंचायतीचा सिंहाचा वाटागावकऱ्यांनी शाळेला पंखे दिले असून लोकसहभागातून संगणक खरेदी करण्यात आले आहे. वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी आर्थिक मदत दिली. ग्रामस्थांच्या स्वप्नाला ग्रामपंचायतीनेही आकार दिला. शाळेत लावण्यात आलेल्या डिजीटल बोर्ड, प्रोजेक्टर व संगणकाचे विद्युत देयक ग्रामपंचायत भरते. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत एक शिपाई शाळेतील कामासाठी देण्यात आला असून त्या शिपायचे मानधनही ग्रामपंचायत देत आहे.