शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
2
भाजपला कोणत्या राज्यात मिळणार सर्वात मोठं यश? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं, केली मोठी 'भविष्यवाणी'!
3
मुलगी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
4
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
5
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास
6
"आमदार टिंगरे कोणाच्या सांगण्यावरुन पोलीस ठाण्यात गेले? अजित पवारांची नार्को टेस्ट करा"; अंजली दमानियांची मागणी
7
“संजय राऊतांमुळे शरद पवारांनी ठाकरे गटाला आपलेसे केले, आता ही अवस्था झाली”; शिंदे गटाची टीका
8
पूर्व तिमोर देश कोणता? बांगलादेशचे तुकडे करून वेगळा देश निर्माण करण्याचा कट; शेख हसीनांच्या दाव्याने खळबळ
9
IPL गाजवणाऱ्या स्टार भारतीय खेळाडूची हिस्ट्री लीक; स्टार किड्सबद्दल काय केलं सर्च?
10
डॉ. तावरेंच्या शिफारसीबाबत अखेर टिंगरेंचे स्पष्टीकरण; म्हणाले,"मी लोकप्रतिनिधी असल्याने..."
11
“राज्यात भाजपाविरोधी लाटेचे चित्र दिसले, पण सांगलीत तर...”; रोहित पाटील यांचा मोठा दावा
12
लोकसभेची खदखद, विधानसभेची चिंता, महायुतीत ठिणगी पडली? "भुजबळांना आवरा"; निलेश राणे संतापले
13
ENG vs PAK : इंग्लंडच्या धरतीवर बाबरची सटकली; पाकिस्तानी कर्णधार अन् चाहत्यामध्ये जुंपली
14
Arvind Kejriwal : "प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण..."; केजरीवालांची अमित शाहांवर टीका
15
जगप्रसिद्ध पण पुण्यात बदनाम झालेल्या पोर्शे कारच्या टीमने डेटा मिळविला; बिल्डर 'बाळा'ची कुंडली मिळणार...
16
"मी काय मूर्ख नाही, भाजपच मोठा भाऊ"; विधानसभेच्या जागांवरुन भुजबळांची नरमाईची भूमिका
17
१५० भारतीयांची फसवणूक, प्रसिद्ध युट्यूबर बॉबी कटारियाला अटक, किती कोटींचा मालक?
18
"आधी मी ५-१० रूपयांसाठी तरसायचो आता...", रिंकूची 'मन की बात', रोहितचे कौतुक
19
IPL 2024 : सोशल मीडियावर कोणाचा कल्ला? धोनी आणि मुंबई इंडियन्सचा जलवा कायम!
20
RBI नंतर LIC भरणार सरकारी खजाना, ₹३,६६२ कोटींचा डिविडेंड देण्याची केली घोषणा

पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप

By admin | Published: June 28, 2014 12:55 AM

उन्हाळ्याच्या सुटीनंतर गुरुवार २६ जूनला शाळेची घंटा वाजली. सर्वत्र पाठ्यपुस्तके देऊन व पुष्पगुच्छाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना ...

अड्याळ : उन्हाळ्याच्या सुटीनंतर गुरुवार २६ जूनला शाळेची घंटा वाजली. सर्वत्र पाठ्यपुस्तके देऊन व पुष्पगुच्छाने विद्यार्थ्यांचे स्वागत केले जात असताना सालेवाडावासीयांनी पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाच्या दप्तर दिरंगाई कारभाराचा परीचय घडवून दिला. मागील तीन वर्षापासून इमारत बांधकामाचा प्रश्न निकाली न निघाल्याने पालकांनी पहिल्याच दिवशी आंदोलन केले.पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायत अंतर्गत सालेवाडा येथे १ ते ४ वर्ग असून २५ विद्यार्थी शिकत आहेत. येथील इमारत जीर्ण अवस्थेत असल्याने मागील तीन वर्षापासून प्रसुतीगृहाच्या एका खोलीत चारही वर्गातील विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे गिरवीत आहे. नवीन इमारत संबंधाने मागील तीन वर्षात अनेकदा निवेदन देण्यात आले. ग्रामशिक्षण समितीने ठराव घेऊन शिक्षण विभागाकडे पाठविला. मात्र आजवर कोणतीही कारवाई झाली नाही. शिक्षण विभागाचे अधिकारी नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार केला असल्याचे सांगून केवळ वेळ मारुन नेत आहेत. इमारतीअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय होत असताना प्रशासन गंभीर नसल्याने पहिल्याच दिवशी आंदोलन करुन विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला. शाळेच्या पहिल्याच दिवशी सरपंच गौतम गोंडाणे, शाळा व्यवस्थापन समितीचे सभापती रंजन वाढवे, छावा संग्राम संघटनेचे जिल्हा सचिव मुनीर शेख, नितीन वरगंटीवार, विनोद गंधे, ग्रामपंचायत सदस्य व शिक्षण समिती सदस्यांच्या नेतृत्वात पालकांनी शाळेला कुलूप ठोकले. सकाळी मुख्याध्यापिका थाटकर व शिक्षक आंधळे शाळेत आले असता आंदोलनकर्त्यांनी त्यांच्यावर प्रश्नाचा भडीमार केला. त्यांनी गटशिक्षणाधिकारी एस.एच. तिडके व केंद्रप्रमुख प्रमोदकुमार अणेराव यांना माहिती दिली. आंदोलनाचे गांभीर्य लक्षात घेता. अधिकाऱ्यांनी सालेवाडा गाठून पालकांची समजूत घातली. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी व पालकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारुन प्रशासनाच्या कारभाराची पोलखोल केली. गटशिक्षणाधिकारी तिडके यांनी नऊ महिन्याच्या आत प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.एकीकडे उत्साहाच्या वातावरणात गोड जेवणाने, पुष्पगुच्छाने स्वागत करुन विद्यार्थ्यांना प्रवेशित केले जात असताना सालेवाडा येथील विद्यार्थ्यांचे शाळेला कुलूप ठोकून स्वागत केले. यामुळे कभी खुशी कभी गम अशी परिस्थिती विद्यार्थ्यांवर ओढवल्याने शिक्षण विभाग काय कारवाई करते याकडे पालकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)