शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अग्निशमन यंत्रणा वाहनांअभावी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2017 00:18 IST

आग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येणारे भंडाऱ्यातील अग्नीशामक दलच संकटात आहे.

पाच तालुक्यात वाहन नाही : आयुध निर्माणी, सनफ्लॅगच्या अग्निशमन वाहनावर राहावे लागते अवलंबूनइंद्रपाल कटकवार भंडाराआग आणि आपत्कालीन परिस्थितीत मदतीला धावून येणारे भंडाऱ्यातील अग्नीशामक दलच संकटात आहे. मुबलक आणि प्रशिक्षीत कर्मचारी नसल्याने या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिसून येतो. एकंदरीत भंडारा व तुमसर तालुक्यातच अग्नीशामक यंत्रणा असली तरी अन्य तालुक्यांचा भारही या विभागावर येत असल्याने संपूर्ण अग्नीशामक यंत्रणा भंडारा जिल्ह्यात कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. या विभागाला अद्ययावत आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.तुमसर येथे नगरपालिका कार्यालयात अग्नीशामक कार्यालय आहे. ८ वर्षापूर्वी येथे वाहन खरेदी करण्यात आले. या वाहनाची जिल्ह्यात मागणी होत असते. नेहमी आग विझविण्यासाठी वाहन उपलब्ध असते. आगीच्या घटना उन्हाळ्यात अधिक प्रमाणात होत असल्याने येथील कर्मचारी नेहमी सज्ज असतात. भंडारा येथे अग्नीशामक दलासाठी स्वतंत्र कार्यालय नाही. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशामक दलाची भूमिका महत्वाची असते. मात्र लाखांदूर तालुक्यात कुठेही अग्नीशामन दल नसल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील जनतेला अचानक लागणाऱ्या आगीपासून बचाव करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगर परिषदेच्या अग्नीशमन दलावर किंवा चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी नगर परिषदेच्या अग्नीशमन दलावर अवलंबून राहावे लागते. पवनी नगर पालिकेने २०१३ मध्ये अग्नीशामकदलाचे वाहन खरेदी केले. या वाहनासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु, अद्यापही या अग्नीशामक दलासाठी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. परीणामी नवीकोरे वाहन शोभेची वास्तू ठरत आहे. यापुर्वी पवनी तालुक्यात आगीच्या अनेक घटना घडल्या. तालुक्यात चौरास भागात आगीने अनेकवेळा शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान टाळण्यासाठी भंडारा येथून वाहन बोलाविण्यात येते. अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळापर्यत पोहचेपर्यत धानपीके किंवा अन्य पिके जळून भस्मसात झाले आहेत.साकोली तालुक्यासाठी अग्नीशमन दलाची यंत्रणा असणे गरजेचे आहे. त्यामुळे यंत्रणा स्थापन करण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन अनेकदा साकोलीवासीयांनी उन्हाळ्यात दिले आहे. मात्र या मागणीकडे नेहमीच लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. आग विझविण्यासाठी नागरिक स्वत: मिळेल त्या साधनाने प्रयत्न करीत असतात.मोहाडी तालुक्यातही अग्नीशामक यंत्रणा नाही. तालुक्यात एखादी घटना घडल्यास भंडारा किंवा तुमसर येथील अग्नीशामक विभागाला पाचारण करावे लागते. अशीच अवस्था लाखनी तालुक्याचीही आहे. खासगी अग्नीशामक व्यवस्थेवर बहुतांश वेळा अवलंबून राहावे लागते. एकंदरीत जिल्हा हा अग्नीशामन यंत्रणेबाबत ढेपाळलेला दिसून येतो. अग्नीशामक विभागात विभागप्रमुख, फायरमन, वाहनचालक, मदतीला दिलेले कर्मचारी, मदतनीस, चौकीदार यांची गरज असते. भंडारा, तुमसरातच वाहनेभंडारा, तुमसर व पवनी नगर परिषदेकडे अग्नीशमन वाहने उपलब्ध आहेत. परंतु पवनी नगर परिषदेचे वाहन चालकाअभावी बंद आहे. जिल्ह्यात कुठेही आगीच्या घटना घडल्या तर भंडारा व तुमसर येथून वाहने जात असतात. तुमसर टोकावर असल्यामुळे ते वाहन साकोली, लाखांदूर येथे जाण्यासाठी बराच उशिर लागतो. त्याठिकाणी भंडारा येथील वाहन घेऊन जावे लागते. त्याशिवाय आयुध निर्माणी कारखाना जवाहरनगर आणि वरठी येथील सनफ्लॅग कारखान्याच्या वाहनांवर अवलंबून राहावे लागते.