शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

कोरोना काळात मूर्तिकारांवर आर्थिक संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST

तुमसर : सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले असून काही दिवसात कान्होबा, गणपती, दुर्गा पूजा असे सण येणार आहेत. मात्र ...

तुमसर : सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले असून काही दिवसात कान्होबा, गणपती, दुर्गा पूजा असे सण येणार आहेत. मात्र या मूर्तिकारांना कोरोना काळापासून उपासमारीची वेळ आली आहे. लाखोंचा व्यवसाय केवळ हजारांवर आलेला आहे.

येत्या काही दिवसांनी ग्रामीण व शहरी भागात जन्माष्टमी सण साजरा केला जातो. श्रीकृष्णाची मूर्ती घरोघरी स्थापना करून पूजा केली जाते. कोरोना काळात मूर्तिकारांनी श्रीकृष्णाची मूर्ती कमी बनविल्याने त्यांना आर्थिक नुकसान होत आहे. कोरोनापूर्वी एक मूर्तिकार ४०० ते ५०० मूर्ती तयार करीत होते. परंतु आता हा आकडा अडीचशे ते तीनशेपर्यंत गेला आहे.

प्रत्येक मूर्तिकाराचे सुमारे ५० हजाराचे आर्थिक नुकसान झाले आहे. यापूर्वी मूर्तीची उंची जास्त होती. परंतु विसर्जन घरीच करीत असल्याने मूर्तीची उंची कमी करण्यात आली आहे. काही भाविकांनी मूर्ती न मांडता फोटोची पूजा सुरू केली आहे. मूर्तीचे प्रमाण कमी झाले आहे. एका मूर्तीची किंमत १०० रुपयांपासून सुरू होत असून ती दोन ते तीन हजारपर्यंत आहे.

मूर्तिकार आधी मूर्ती बनविण्याचे काम जुलै महिन्यापासून सुरू करीत असत, कारण त्यावेळी कोरोना नसल्याने लोकांची घेतलेली ऑर्डर असलेली मूर्ती बनविली जात होती. परंतु आता फक्त एक महिन्याच्या कालावधीतच मूर्ती बनविण्याचे काम सुरू झाले. पूर्वी २५० मूर्ती बनविण्यात येत होत्या. आता ती १५० पर्यंत आली आहे. मागील वर्षी दीडशे मूर्ती बनवली होती त्यात केवळ ५० मूर्ती विकल्या नाही. त्यामुळे मूर्तिकारांना तीस हजाराचे नुकसान झाले.

मूर्तिकारांना मूर्ती बनविण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील काटोल परिसरातील सावरगाव येथून माती आणावी लागते. ही पांढरी आणि लाल माती आठ हजार रुपये चार चाकी गाडीने आणली जाते. भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव येथील काळी माती तीन हजार रुपये प्रति ट्रॅक्टर ट्रॉली प्रमाणे विकली जाते. या दोन्ही मातींना मिक्स करून मूर्ती बनविली जाते. अकरा हजार रुपये मूर्ती बनविण्याच्या आधी खर्च केल्या जातो आणि मूर्तिकार पैसे वाचवावे म्हणून घरातीलच मंडळी मूर्ती बनवून मूर्तींना आकार देऊन व मूर्तीला रंग करून त्यांना सजवून ग्राहकाला विकतात.

रोजीने काम करण्यास माणसाला ठेवले असता त्याला तीनशे रुपये रोजी द्यावी लागते. त्यामुळे ते परवडण्यासारखे नाही. याकरिता घरचीच मंडळी मूर्ती बनविण्यास हातभार लावतात. कोरोना काळापासून सार्वजनिक गणपती दुर्गा देवी मूर्तीची उंची तीन फूट केल्याने मूर्तिकारांना नुकसान होत आहे. कोरोनाच्या पूर्वी सार्वजनिक गणपती किंवा दुर्गा देवीची मूर्ती पाच ते सात फूट असायच्या आणि त्या पाच ते दहा हजारांपर्यंत विक्री केल्या जात होत्या. परंतु आता तीन फुटाची मूर्ती तीन हजाराला विक्री केली जाते. एका मूर्तीमागे सात हजाराचे नुकसान होत आहे. लाखोंची उलाढाल आता केवळ हजारावर आली आहे.

तुमसर शहरातील शास्त्री वॉर्ड या परिसरात श्रीकृष्ण गणपती व दुर्गा देवीची मूर्ती बनविल्या जातात. आर्थिक नुकसानामुळे मूर्तिकारांनी शासनाने मदत करावी, अशी मागणी केली आहे.

कोट

एक व्यवसाय म्हणून आम्ही मूर्ती तयार करीत आहोत. आम्हाला कसलाही फायदा होत नाही. कोरोना काळापूर्वी आमचा व्यवसाय लाखोंचा व्हायचा, पण आता हजारावर आलेला आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला मदत करावी.

संजय बोरसरे, मूर्तिकार, शास्त्रीनगर, तुमसर