शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वनमजुरांना मिळणार मजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 23:31 IST

तालुक्यातील नाकाडोंगरी वनविभागांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात परिसरातील गावात प्लॅटेशनची कामे ७-८ महिन्यापूर्वी झालीत. परंतु त्याची मजुरी अद्याप देण्यात न आल्याने वनमजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. परिणामी संपूर्ण मजुरी मिळावी म्हणून मंगळवारला नाकाडोंगरी येथे जेलभरो आंदोलन पुकारला.

ठळक मुद्देनाकाडोंगरी येथील प्रकार : जेलभरो आंदोलनाला यश

आॅनलाईन लोकमततुमसर : तालुक्यातील नाकाडोंगरी वनविभागांतर्गत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात परिसरातील गावात प्लॅटेशनची कामे ७-८ महिन्यापूर्वी झालीत. परंतु त्याची मजुरी अद्याप देण्यात न आल्याने वनमजुरांवर उपासमारीची वेळ आली होती. परिणामी संपूर्ण मजुरी मिळावी म्हणून मंगळवारला नाकाडोंगरी येथे जेलभरो आंदोलन पुकारला.यात परिसरातील नाकाडोंगरी, लोभी, आष्टी, राजापूर, हिरापुर हमेशा व प ाथरी गावातील मजुरांचे १४ लाख रुपयांचे संपूर्ण वेतनाचे आरटीईजीएस झाल्याने एक दोन दिवसात मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होणार आहे. त्यामुळे मजूर वर्गात उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे आंदोलनात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २७५ घरकुल जे आॅनलाईन यादीतून गहाळ झाले तो प्रश्न आंदोलनादरम्यान अधिकाºयांच्या अनुपस्थितीमुळे अनुत्तरीतच राहिला. सदर विषय हा खंड विकास अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा असतानाही त्या विभागाचे एकही अधिकारी किंवा त्यांचा प्रतिधिी उपस्थित न झाल्यामुळे अधिकाºयांनी लोकशाहीचा गळा कापला असल्याचे ठपका लावून तहसीलदार शासनाकडे संबंधितावर कारवाईसाठी प्रोसेडींग तयार करणार असल्याचे सांगून आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ तहसील कार्यालयात बोलावले. त्यामुळे आंदोलनाने उग्र रुप न घेता आंदोलनाला स्थगिती दिली व मार्च पूर्वी गहाळ झालेले घरकुल न मिळाल्यास लाभार्थी रस्त्यावर उतरेल असा गर्भीत इशाराही यावेळी देण्यात आला. आंदोलनाचे नेतृत्व माजी उपसभापती शेखर कोतपल्लीवार यांनी केले. आंदोलनाला वनविभागाचे सीसीएफ कोडापे, नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी धनविजय यांनी भेट देवून आंदोलनांची सांत्वना केली. आंदोलनात नाकाडोंगरीचे सरपंचा सारिका कोतपल्लीवार, जितू सयाम, ग्रा.पं. सदस्य सुमित गौपाले, विजय राऊत, मिना मेश्राम, शामलता पारधी, मिश्री देशमुख, भगत राऊत, विजय रासेळ, राजकुमार ढोमणे, इंदू राऊत, सरिता राऊत, रंजित शहारे, रुपचंद पारधी, नंदू भुरे, भागवत पुष्पतोडे, घनश्याम शहारे, जयदेव सोनवाने, विनोद राऊत, श्रीहरी मुंगुसमारे, मोरेश्वर सोनवाने, मुलचंद पंधरे, राजू राऊत, रवी बाविसताले व असंख्य वनमजूर व २७५ घरकुल लाभार्थी उपस्थित होते.