शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ महिलेला गमवावा लागला हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2017 00:26 IST

खंडीत वीज पुरवठा सुरळी तकरण्याकरिता विजेच्या खांबावर चढलेल्या महिला वीज कर्मचाऱ्याला जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाला.

भंडारा दक्षिण क्षेत्रातील घटना : कर्तव्यावर असताना विजेच्या खांबावर शॉकमुळे भाजली लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खंडीत वीज पुरवठा सुरळी तकरण्याकरिता विजेच्या खांबावर चढलेल्या महिला वीज कर्मचाऱ्याला जिवंत विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाला. यात तिचे दोन्ही हात भाजल्याने नागपूर येथे उपचार सुरु आहे. दरम्यान हात निकामी झाल्याने उजवा हात कापावा लागल्याचा दुर्देवी प्रसंगी वीज कर्मचाऱ्यावर ओढावल आहे. सदर गंभीर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न वीज वितरण अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.२९ मे च्या सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हा सत्र न्यायालयासमोर असलेल्या एका विद्युत जनित्रावर बिघाड आला. विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने तो पूर्ववत करण्याकरिता भंडारा वीज वितरण कंपनीच्या दक्षिण क्षेत्रातील सहाय्यक वीज कर्मचारी कृष्णा जिभे व अजय कुंदभरे यांच्यासह संध्या खोब्रागडे ही महिला कर्मचारी घटनास्थळावर पोहचली. यावेळी जिभे आणि कुंदभरे यांनी संध्याला खंडीत वीजपुरवठा दुरुस्त करण्याकरिता खांबावर चढविले. यावेळी तिथून वाहत असलेल्या ११ केव्ही जिवंत विद्युत तारांना तिचा स्पर्श झाला. यात ती तारांना चिपकली. त्यामुळे सहकारी दोन्ही कर्मचाऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याने तिथे असलेल्या प्रकाश अटाळकर यांच्यासह अन्य नागरिकांनी बांबूच्या सहाय्याने तिला तारांपासून दूर केले व तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने तिला नागपूर येथील शुअरटेक रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान तेथील वैद्यकीय चमूने संध्याच्या दोन्ही हातापैकी उजवा हात निकामी झाल्याने शनिवारला तो कापल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या गंभीर घटनेची तातडीने दखल घेऊन सहकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दोघांनाही पाठबळ दिले आहे. त्यांच्यावर कारवाई न करता प्रकरणाची गुंतागुंत वाढवून महिला कर्मचाऱ्याला दोषी दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न चालविला असल्याची चर्चा वीज कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.