शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राजेदहेगावचा पाणीपुरवठा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 21:47 IST

सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणी लगतच्या शेतकऱ्याने आपल्या शेतातल्या विंधन विहीरीचे पाणी सुरू करीत असल्याने सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणीपुरवठा बंद झाला होता. यासंदर्भात राजेदहेगाव येथील महिलांनी एल्गार पुकारला होता. याची दखल घेतल्याने पाणीपुरवठा सुरू झाला.

ठळक मुद्देमहिलांचा एल्गार : लोकप्रतिनिधींनी घेतली दखल

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहनगर : सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणी लगतच्या शेतकऱ्याने आपल्या शेतातल्या विंधन विहीरीचे पाणी सुरू करीत असल्याने सार्वजनिक विंधन विहिरीचे पाणीपुरवठा बंद झाला होता. यासंदर्भात राजेदहेगाव येथील महिलांनी एल्गार पुकारला होता. याची दखल घेतल्याने पाणीपुरवठा सुरू झाला.मागील पंधरा दिवसापासून गावात पाणी प्रश्नामुळे हाहाकार निर्माण झाला होता. या प्रश्नाकडे स्थानिक शासन प्रशासनापासून तर जिल्हा प्रशासन गावाला भेट देणे सुरू होते. शासकीय कर्मचाºयांच्या तीन दिवस संपामुळे गावातील पाणी प्रश्न चिघडला होता.बाधीत शेतकरी व स्थानिक शासन प्रशासन यांचे ठिकठिकाणी पत्र व्यवहार एकमेकाविरूद्ध सुरू होते. गाव एकीकडे तर बांधीत शेतकरी दुसऱ्या बाजुला कुणी कुणाची ऐकता दरम्यान गावातील महिलांनी निश्चय केला. गावातील कोणतीही महिला शेतावर व इतर कामावर जाणार नाही, असा पवित्रा घेतला होता. ग्रामपंचायतला कुलूप लावून आपला निषेध व्यक्त केला होता.९ आॅगस्टला पाण्याची मटकी, गुंडी ग्रामपंचायत प्रवेशद्वारासमोर फोडण्यात आले होते. दुपारनंतर आमदार रामचंद्र अवसरे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती प्रेमदास वनवे, माजी समाजकल्याण सभापती राजकपूर राऊत, घटनास्थळाला भेट देवून सायंकाळपर्यंत तळ ठोकून होते. कायदा व सुव्यवस्था नियंत्रणासाठी एस.के. बारसे आपल्या ताफ्यासह डेरेदाखल होते. .आमदार अवसरे यांच्या मध्यस्थिने नरेंद्र भोंडेकर यांनी सार्वजनिक विंधन विहिरीचे बटन दाखून गावातील पाणीपुरवठा सुरू केला.बाधीत शेतकºयांची विंधन विहीर बंद करण्यात आली. यावेळी बाधीत शेतकरी नारायण ढोबळे उपस्थित होते. ही कारवाही रात्री ११ वाजतापर्यंत सुरू होती आणि गावकºयांनी पाणी सुरू झाल्यामुळे सुटकेचा श्वास सोडला.