शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बावनथडी जलाशयाचे पाणी नदीपात्रात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:35 IST

उन्हाळी पिके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तत्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांनी ...

उन्हाळी पिके मरणासन्न अवस्थेत आली आहेत. परिणामी तत्काळ प्रभावाने बावनथडी प्रकल्पाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी केली आहे. तुमसर मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे अशी ओळख निर्माण झालेल्या राजीव गांधी (बावनथडी) प्रकल्प हा बावनथडी नदीवर उभारण्यात आला. त्यामुळे मध्यप्रदेशातून नदीवाटे येणारे पाणी राजीव गांधी प्रकल्पातच अडविले जात आहे. परिणामी बावनथडी नदीत पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे तालुक्यातील देवनारा, चिखली, डोंगरी बुज., रोहणीटोला, चांदमारा, लोभी, आष्टी, बावनथडी, पाथरी, कवलेवाडा, सकरघरा, घानोड, सोंडया वारपिंडकेपार, महालगाव या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. तसेच निससगावर अवलंबून असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून येथील शेतकरी आपल्या शेतात हंगामी पिकांचे उत्पादन घेतात. मात्र, गत पावसाळ्यात पडलेला अत्यल्प पाऊस व उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे विहिरी, तलाव तळ गाठत आहेत. त्यावर शेती फिडरच्या भारनियमनामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना फटका बसला आहे. कोरोनामुळे आधीच कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांनी परत कर्जबाजारी होऊन नव्या उमेदीने उन्हाळी हंगामात ऊस व धान पीक शेतात पिकवले. परंतु विहारी, तलाव, बोअरवेल आटल्याने उभ्या पिकांना कसे वाचविता येईल, या विवंचनेत शेतकरी सापडला असतानाच बावनथडी जलाशयाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी आमदार राजू कारेमोरे यांच्या माध्यमातून केली होती. त्या केलेल्या पाठपुराव्यांना यश मिळाले असून, शेतकऱ्यांत पाणी सोडल्याने आनंद व्यक्त होत आहे. रायुका अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे यांनी आमदार राजू कारेमोरे यांच्या ही बाब निदर्शनास आणून सतत पाठपुरावा केल्यानेच अखेर बावनथडी बावनथडी प्रकल्पाचे नदीपात्रात ४८ क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांसह नदीपात्रालगतच्या नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागल्याने नागरिक सुखावले आहेत.