शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ महिलांचे उपोषण मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:09 IST

तालुक्यातील ४० गावातील अंगणवाडी मध्ये पोषण आहार बनविणाऱ्या महिला बचत गटाच्या ४८ महिला यांचे १० महिन्यांपासून आहार बनविण्याचे बिल मिळाले नाही.

ठळक मुद्देबाळा काशिवार अर्थसंकल्पात मांडणार प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील ४० गावातील अंगणवाडी मध्ये पोषण आहार बनविणाऱ्या महिला बचत गटाच्या ४८ महिला यांचे १० महिन्यांपासून आहार बनविण्याचे बिल मिळाले नाही. थकीत महिन्याचे बिल काढा या मागणीसाठी १५ फेब्रुवारी पासून आहार बनविने बंद करून एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय लाखांदुर समोर ४८ महिला बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. १६ फेब्रुवारी रोजी आमदार बाळा काशिवार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागण्या मंजुर करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर लिंबुपाणी पाजुन उपोषण मागे घेतले.तालुक्यातील ६० गावात अंगणवाडी मध्ये आहार बनविणाऱ्या महिला बचत गटांना बिलाची देयके मागील १० महिन्या पासून थकीत आहेत.मात्र संबंधित बचत गटांनी वरीष्ठाकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्याकडे सवार्नीच दुर्लक्ष केले होते. त्यामुळे तालुक्यातील विविध गावातील ४८ महिला १५ फेब्रुवारी रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय लाखांदुर समोर बेमुदत उपोषणाला बसल्या होत्या. उपोषणकर्त्या महिलांनी सांगितल्याप्रमाणे एक रेशिपी तपासणी साठी ३०० रुपयांपर्यंत खर्च येत असतांना संबंधित कर्मचारी ह्या सदर रेसिपी तपासणीसाठी ७०० ते ९०० रुपये घेतल्याची ही माहिती दिली.तालुक्यातील २० ते २५ गावातील अंगणवाडी मध्ये आहार शिजविण्याचे काम तेथील सेविका व मदतनीस करीत आहेत. त्यामुळे त्यांना मानधन मिळत असल्यामुळे सदर ठिकाणचे आहार बनविण्याचे काम हे त्या गावातील महिला बचत गटाला देण्यात यावी, या मागण्यांना घेवून उपोषणाला प्रारंभ केला होता. यासंदर्भात आमदार बाळा काशिवार यांना माहीती मिळताच त्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समस्यांच निराकरण केल व अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्न मांडून समस्या मार्गी लावणार असल्याचे सांगितले.यावेळी सभापती मंगला बगमारे, उपसभापती शिवाजी देशकर, खंडविकास अधिकारी डि.एम.देवरे, जिल्हा परिषद सदस्या माधुरी हुकरे, भाजपा तालुकाध्यक्ष नुतन कांबळे, भाजयुमो तालुकाध्यक्ष हरीष बगमारे, नगराध्यक्षा निलम हुमने, उपाध्यक्ष नरेश खरकाटे, नगरसेवक प्रल्हाद देशमुख, रमेश मेहंदळे, पंचायत समिती सदस्य कुंडलिक पेलने, नेहा बगमारे, विजय खरकाटे, भारत मेहंदळे, भुषण चिञिव, रजत गौरकर, यश खञी, जितेंद्र ढोरे, तुलसीदास बुरडे, गिरीष भागडकर, रिजवान पठान, दादाजी तुरबुडे, संजय राऊत, विनोद ढोरे यांच्यासह उपोषणकर्त्या ४८ महिला उपस्थित होत्या.