शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

अखेर ‘तो’ शिक्षक निलंबित

By admin | Updated: October 16, 2015 01:03 IST

कोका येथील वनवैभव आदिवासी आश्रमशाळेतील इंग्रजी विषयाचा सहाय्यक शिक्षक युवराज भैसारे शाळेतीलच अकरावीत ...

कोका आश्रमशाळेतील प्रकरण : नोकरीतून बडतर्फ करण्याची पीडितेची मागणीकरडी : कोका येथील वनवैभव आदिवासी आश्रमशाळेतील इंग्रजी विषयाचा सहाय्यक शिक्षक युवराज भैसारे शाळेतीलच अकरावीत शिकत असलेल्या मुलीला सहा महिन्यांपासून त्रास देत होता. शिक्षकाचा हा प्रकार असह्य झाल्याने या विद्यार्थीनीने उघडकीस आणून या शिक्षकाविरुध्द कारवाईची मागणी केली. या प्रकरणाची दखल घेत आदिवासी प्रकल्प अधिकारी ह.मा. मडावी यांनी तत्काळ आदेशाने सदर शिक्षकाला १४ आॅक्टोबर रोजी निलंबित करण्याचे आदेश दिले. भंडारा तालुक्यातील कोका येथील वनवैभव आदिवासी आश्रमशाळेतील इंग्रजी विषयाचा सहाय्यक युवराज भैसारे हा शाळेतील एका विद्यार्थीनीला मागील सहा महिन्यापासून त्रास देत होता. त्याचा त्रास सतत सुरु असल्याने मुलीला तो असह्य वाटत होता. पीडित मुलगी दहावीतून अकरावीमध्ये प्रवेश घेतल्यानंतरही त्याचा हा त्रास सुरुच होता. दरम्यान सुटी घेऊन ही मुलगी घरी गेली असता तिने हा किळसवाणा प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी आदिवासी संघटनेच्या पदाधिका-यांसोबत १४ आॅक्टोबर रोजी ही तक्रार मुख्याध्यापकांकडे केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने ही माहिती आदिवासी प्रकल्प अधिकारी मडावी यांना सांगितली त्यांनी तत्काळ प्रभावाने सदर शिक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)