शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

‘त्या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीला अखेर स्थगिती

By admin | Updated: October 16, 2015 01:00 IST

राज्यातील कुष्ठरोग विभागातील निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश मागील आठवड्यात धडकले होते.

प्रकरण कुष्ठरोग विभागातील : पुणे येथील सहसंचालकांचे आदेशइंद्रपाल कटकवार भंडाराराज्यातील कुष्ठरोग विभागातील निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश मागील आठवड्यात धडकले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकशित करताच याची दखल घेत जिल्ह्यातील आठ कर्मचाऱ्यांसह राज्यातील २१७ कर्मचाऱ्यांच्या कार्यमुक्तीच्या आदेशाबाबत स्थगिती देण्यात आली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय आनंदाची पर्वणी देणारा ठरला आहे. सर्वेक्षण करुन कुष्ठरोगी शोधून काढणाऱ्या निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश धडकल्याने त्यांच्यावर उपासमारीचे संकट कोसळण्याची वेळ आली होती. राज्यातील एकूण २१७ तर भंडारा जिल्ह्यातील ८ निमवैद्यकिय कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता. दीर्घकालीन अनुभव असलेल्या या कर्मचाऱ्यांसाठी १५ आॅक्टोंबरपासून अनुदान न मिळाल्यामुळे त्यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश काढण्यात आले होते. सहायक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यामधील राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना १५ आॅक्टोबर २०१५ पासून कार्यमुक्त करण्यासंदर्भात सहायक संचालकांना आदेशाच्या प्रतिलिपी पाठविण्यात आलेल्या होत्या. ‘प्रोजेक्ट इम्प्लीमेंट प्लान’ अंतर्गत जिल्हास्तरावरील कंत्राटी कर्मचारी फिजीओथेरपीस्ट व पॅरामेडीकल वर्कर यांच्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले नाही. परिणामी जिल्ह्यातील कार्यरत कंत्राटी फिजीओथेरपीस्ट व पॅरामेडीकल वर्कर यांना कार्यमुक्त करुन त्या दिवसांपर्यंतचे मानधन उपलब्ध असलेल्या निधीमधून करण्यात यावे असे आदेश देण्यात आले होते. याबाबत कुष्ठरोग कर्मचाऱ्यांंनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केल्याने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दखल घेतली. केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी कर्मचाऱ्यांची समस्यांची जाणून घेत केंद्र शासनाच्या पुढील आदेशापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीबाबतच्या आदेशावर स्थगिती आणण्याची सुचना कुष्ठरोग विभागाच्या सहायक संचालकांना दिली आहे.जिल्ह्यात कुष्ठरोग निवारण संदर्भात कुष्ठरोग तंत्रज्ञांची नेमणुक करण्यात आलेली नाही. पर्यवेक्षण नाही. अपुर्ण भौतिक उपचार, अपूर्ण साहित्य वाटप आदी कारणांमुळे शासनाचे कुष्ठरोग निर्मुलनाचे काम अपूर्ण आहे. मागील १५ वर्षांपासून सदर कर्मचारी कुष्ठरोगाचे प्रशिक्षण घेवून प्रामाणिकतेने कार्य करीत आहेत. कुष्ठरोगाचे प्रमाण कमी करण्यावर भर देणे, रुग्णांवर भौतीकपचार, ड्रेसींग, औषध वाटप, जनजागृती आणि इतरही शासनाच्या आरोग्य सेवेंतर्गत निरनिराळी कामे केली जात आहेत.