शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ दारू दुकानाला ठोकले सील

By admin | Updated: September 10, 2015 00:21 IST

मागील चार वर्षांपासून खैरी दिवाण येथील दारुचे दुकान बंद करण्यात यावे या मागणीसाठी महिलांचा लढा सुरू होता.

खैरी दिवाण येथे आनंदोत्सव : रणरागिणींच्या चार वर्षांच्या लढ्याला यशपवनी : मागील चार वर्षांपासून खैरी दिवाण येथील दारुचे दुकान बंद करण्यात यावे या मागणीसाठी महिलांचा लढा सुरू होता. मद्य सेवनाने अनेकांचे संसार उदध्वस्त झाल्यामुळे महिला दारूबंदीविरुद्ध पेटून उठल्या. त्यासाठी गावातील शेकडो महिलांनी गांधीगिरी मार्गाने दारू दुकान बंद करण्याकरीता आंदोलन करीत होत्या. अखेर मंगळवारला रात्री या दारू दुकानाला उत्पादन शुल्क विभागाने सील ठोकले. त्यामुळे मागील चार वर्षापासून सुरू असलेल्या महिलांच्या लढ्याला यश आले आहे. २६ जानेवारी २०११ रोजी ग्रामसभेत रमादेवी रेड्डी यांना दारू विक्रीसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता. त्यामुळे गावात असंतोष निर्माण झाला होता. या दारू दुकानामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. त्यामुळे हे दुकानच हटविण्याकरिता महिला व पुरूष एकवटले होते.२४ डिसेंबर २०१२ रोजी भजन आंदोलन करण्यात आले. २६ जानेवारी २०१३ रोजी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रे, ई-मेल पाठविले. याची शासनाने दखल घेत तत्कालीन ग्रामसेवक आर.डी. मेश्राम यांना निलंबित करण्यात आले व तत्कालीन सरपंचाविरुद्ध कलम ३९ अन्वये कारवाई करण्यात आली.दारूबंदी प्रकरण मंत्रालय ते न्यायालय असा प्रवास करून हे आंदोलन अयशस्वी ठरले. तरीही खचून न जाता येथील महिला, पुरूष व कार्यकर्त्यांनी कोणत्याही परिस्थितीत हे दुकान हटवायचे असा निर्धार केला. १२ महिन्यानंतर गावातील शेकडो महिलांच्या निवेदनानंतर ग्रामपंचायतने २० एप्रिल २०१५ रोजी विशेष महिला ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेत गावातील ३५८ म्हणजेच ६० टक्के महिलांनी दारू दुकान बंद करण्याचा ठराव पारीत केला. हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे जाण्यापूर्वी न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली होती. २८ आॅगस्ट २०१५ ला हा स्थगनादेश रद्द झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने अपील खारीज केला. त्यानंतर नागपूर खंडपिठात अपील दाखल करून न्यायालयाने ३१ आॅगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत स्थगनादेश दिला. ३ सप्टेंबरला उच्च न्यायालयाने हे प्रकरण खारीज केल्यामुळे देशी दारू दुकान बंद करण्याचा मार्ग मोकळा झाला.जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाने आयुक्त यांनी आदेश जारी करून उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक पी.पी. पटले हे खैरी दिवान येथे येऊन मंगळवारला रात्री देशी दारू दुकानाला सील ठोकले. या आदेशाची प्रत सरपंच अनिता कुलकर यांना देण्यात आली. या आंदोलनात सुरुवातीपासून अनिल मेंढे, राजेंद्र फुलबांधे, हरीश तलमले, सरपंचा अनिता कुल्लरकर, महिला समितीच्या अध्यक्षा उषा हटवार, पुरूषोत्तम तेलमासरे, नीळकंठ सेलोकर, सुखदेव हटवार, वामन मोहरकर, अंबरदास धनविजय, मुरलीधर पंचभाई यांच्यासह गावातील महिला, पुरूष, युवक, युवती आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)