शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अखेर २.६ कोटींचा निधी प्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:06 IST

तुमसर तालुक्याला नरेगातंर्गत मिळणारा प्रलंबित कुशल निधी त्वरित देण्यात यावे, अन्यथा आक्रोश आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तालुक्यातील सरपंच संघटनेनी प्रशासनासह राज्य शासनाला दिला होता.

ठळक मुद्दे'आक्रोश' मोर्चाचा धसका : सरपंच संघटनेच्या संघर्षाला मिळाले यश

आॅनलाईन लोकमततुमसर : तुमसर तालुक्याला नरेगातंर्गत मिळणारा प्रलंबित कुशल निधी त्वरित देण्यात यावे, अन्यथा आक्रोश आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तालुक्यातील सरपंच संघटनेनी प्रशासनासह राज्य शासनाला दिला होता. अखेर सरकारने संबधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर दोन कोटी सहा लाख रुपयांचा कुशल निधी वळता केला आहे.पूर्वी उन्हाळ्यात ग्रामीण भागातील मजुराच्या हाताला काम मिळावा म्हणून राज्य सरकारने रोजगार हमी योजना काढली होती. त्यात उद्देश फक्त मजुरांना काम इतकेच होते. मात्र पण २००५ ला केंद्र सरकार ने तिच योजना देश पातळीवर राबविण्याचा कायदा बनविला. त्याला 'नरेगा' असे नाव दिले. .त्याच्यात सुधारणा करुन दोन भाग केले. एक अकुशल व दुसरा कुशल. त्यात ग्रामपंचायतने ग्रामसभेत अकुशल व कुशल कामांचे नियोजन करून ६० टक्के निधी, मजुरांना काम व ४० टक्के निधीत गावाचा विकास असे धोरण तयार केले. त्या अंतर्गत ग्रामीण भागात मजुरांना काम व मोठ्या प्रमाणात सीमेंट रस्ते, नाल्या, सिंचन विहीर, पाणघाट, गुरांचे गोठे, कुकुटपालन शेड, मजगी, सिमेंट बंधारा रोपवाटीका, शौचालय व इतर सार्वजनिक आणि लाभाच्या योजनांच्या त्यात समावेश केले. पुर्वी मजुरांनी काम केल्यानंतर अनेक महिने मजुरी मिळत नव्हताी. आता त्यात काही प्रमाणात सुधारणा होऊन मजुरांना बँक खात्यावर मजुरी जमा होत आहे. परंतु कुशल कामाची निधी संबधित ग्रामपंचायतने काम केल्यानंतर वर्षभर जमा होत नाही. त्याचा ग्रामीण विकासावर परिणाम होऊन जिल्ह्यतील अनेक ग्रामपंचायत निधी अभावी अडचणीत सापडलेल्या होत्या. त्यात तुमसर तालुक्यातिल सरपंच संघटनेनी पुढाकार घेऊन प्रलंबित कुशल निधी त्वरित मिळावी, म्हणुन नरेगा आयुक्तांना निवेदन देऊन निधीची मागणी केली होती, अन्यथा सरकार विरोधात 'आक्रोश' मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. दिलेल्या मुदतीत सरकारने काम पूर्ण केलेल्या संबधित ग्राम पंचायतींच्या खात्यावर निधी वळती केली नाही. त्या विरोधात सरपंच संघटना रस्त्यावर आली. पंचायत समितीसमोर आंदोलन केले. शेवटी एकता आणि संघषा समोर सरकारला झुकावे लागले. सरकारने संबधित ग्रामपंचायतींच्या खात्यावर दोन कोटी सहा लाख रुपयांचा कुशल निधी वळती केला.सरपंच संघटनेचे अध्यक्ष गजानन लांजेवार, पं.स.सदस्य हिरालाल नागपुरे, अरविंद राऊत, राजेंद्र ढबाले, शिशुपाल गौपाले, माजी सरपंच शिवलाल नागपुरे, दिलीप लांजेवार, नरेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनाला माजी आमदार अनिल बावनकर, मधुकर कुकडे, देवचंद ठाकरे, जि.प.सभापती धनेंद्र तुरकर, शंकर राऊत, सिमा भुरे, सुरेश राहांगडाले, ठाकचंद मुंगूसमारे, प्रफुल वºहाडे, महेंद्र चौव्हाण आणि इतर सर्व सरपंच संघटनेच्या पदाधिकाºयांनी संघर्षाला साथ दिली.