शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2017 00:25 IST

मागील वर्षभरापासून खंडीत असणारा महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

८५ लाखांचा निधी मंजूर : यावर्षी पाण्याचा उपसा होणारलोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड/ तुमसर : मागील वर्षभरापासून खंडीत असणारा महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी ८५ लाख रुपयांचा निधी खेचून आणण्यात आमदार चरण वाघमारे यांना यश आले आहे. येत्या दोन दिवसात प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा होणार आहे.सिहोरा परिसरात १४ हजार हेक्टर आर शेती ओलीताखाली आणणाऱ्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा गेल्या वर्षात ८० लाखांची थकबाकी असल्यामुळे वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. या शिवाय प्रकल्पस्थळात विद्युत मिटर जप्तीची कारवाई वीज वितरण कंपनीमार्फत करण्यात आली. प्रकल्पस्थळात हा घटनाक्रम सुरु असताना चुल्हाड शिवारात उन्हाळी धान पिकाला चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यात आले. यामुळे जलाशय पूर्णत: रिकामे झाले. खरीप हंगामात सिंचनासाठी पाणी नसल्याने शेतकऱ्यात चिंता निर्माण झाली. शिवाय प्रकल्पस्थळाकडे असणारी विजेची थकबाकी शेतकऱ्यांची धाकधुकी वाढविणारी ठरली. ऐन पावसाळा तोंडावर असताना पंपगृहाची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली नाही. टाकीतील गाळ काढण्यात आली नाही. विजेचा पुरवठा सुरु करण्यात आला नाही. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले. प्रकल्पस्थळात असणाऱ्या समस्या निकाली काढण्यासाठी आ.चरण वाघमारे यांनी प्रयत्न सुरु केले. ८५ लाखांचा पॅकेज खेचून आणण्यात त्यांना यश आले. ८० लाखांची वीज देयकाची थकबाकी वीज वितरण कंपनीला देण्यात आली आहे. उर्वरीत पाच लाखांचा निधी प्रकल्पस्थळात देखभाल आणि दुरुस्तीच्या कार्यात खर्च करण्यात येणार आहे. तब्बल वर्षभरानंतर प्रकल्पस्थळात खंडीत वीज पुरवठा सुरु करण्यात आला आहे. पंपगृहाचे देखभाल व दुरुस्तीचे कामांना गती देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात बावनथडी नदी पात्रातील पाण्याचा उपसा प्रकल्पस्थळात केला जाणार आहे. या पाण्याची साठवणूक चांदपूर जलाशयात होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत. सिंचनात ६० कोटींचा अनुशेष पाणी वाटप करणारा लघु पाटबंधारे विभाग अडचणीत आहे. या विभागात रिक्त पदाचा अनुशेष आहे. याशिवाय डावा आणि उजवा कालवा अंतर्गत नहर व पादचाऱ्यांची झालेली अवस्था डोकेदुखी वाढविणारी आहे. या विभागाअंतर्गत असणाऱ्या रनेरा स्थित डाक बंगल्याची स्थिती भीतीदायक झाली आहे. या विभागात विकास कार्यासाठी ६० कोटींचा अनुशेष आहे. नहराचे सिमेंट अस्तरीकरण अडले आहे. कार्यालयाचे इमारती जीर्ण झाली आहे. फर्निचर तुटलेला आहे. या समस्या निकाली काढण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.