शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 00:57 IST

बहुप्रतीक्षीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सिमेवर जिल्हा पोलीस विभागाने कायमस्वरुपी पोलीस चौकीच्या प्रस्तावाला मजुंरी दिली आहे. या पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू यांचे हस्ते करण्यात आले आहे. या चौकीला गावे हस्तांतरीत होणार आहेत.

ठळक मुद्देरिक्त पदांमुळे पोलिसांचा ताण वाढलाय: चौकीला गावे हस्तांतरित होणार, पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बहुप्रतीक्षीत असणाऱ्या बपेरा आंतरराज्यीय सिमेवर जिल्हा पोलीस विभागाने कायमस्वरुपी पोलीस चौकीच्या प्रस्तावाला मजुंरी दिली आहे. या पोलीस चौकीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता साहू यांचे हस्ते करण्यात आले आहे. या चौकीला गावे हस्तांतरीत होणार आहेत.सिहोरा पोलीस ठाणेपासून बपेरा आंतरराज्यीय सिमा १८ किमी अंतरावर आहे. या सिमेवरुन जिल्ह्यात अवैध साहित्यांची आयात व निर्यात करण्यात येत आहे. यामुळे या सिमेवर कायमस्वरुपी पोलीस चौकी मंजुर करण्याची जुनी ओरड आहे. बपेरा आंतरराज्यांचे सिमेवर नेण्याने पोलीस चौकीचे प्रस्तावाला याआधी मंजुरी देण्यात आली आहे. पोलीस चौकीचे इमारत बांधकाम करण्यासाठी देवसर्रा गावाचे हद्दीत जागेची पाहणी करण्यात आली आहे. पोलीस विभागाने मध्यंतरी १० लाख रुपये खर्चाला मंजुरी दिली असल्याची चर्चा होती. या इमारत बांधकामाचे हस्तांतरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आले आहे. परंतु जागेचा वाद आणि निधीचा वानवा असल्याने पक्के इमारत बांधकाम सुरु करण्यात आले नाही. पोलीस चौकी इमारत जागेची वारंवार पाहणी करण्यात येत आहे. परंतु मुहूर्त सापडेना असे झाले आहे. दरवर्षी सिमेवर राहून चौकी तयार करण्यात येत आहे.ही सेवा बजावितांना पोलीसांची वाताहत होत असल्याचे जिल्हा पोलीस विभागाने खाजगी घरात आंतरराज्यीय सीमेवर गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला पोलीस चौकीला मंजुरी दिली. बुधवारला जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू यांचे हस्ते पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले. आंतरराज्यीय सिमेलगत असणारे २० गावे या चौकीला हस्तांतरीत केली जाणार आहे. यामुळे सिहोरा गावाचे लांब पल्ल्याचे अंतर गाठण्याने या चौकीत पोलीसांची नियुक्त्या सिहोरा पोलीस ठाणेमधून केली जाणार आहे.पोलीस ठाण्यात रिक्त पदाची वानवा असल्याने पोलीसांना माथापच्ची करण्याची वेळ येणार आहे. पोलीस ठाण्यात ५३ पदे असतांना २५ पोलीस कार्यरत आहेत. यात १०-१२ पोलीस नियमित वैद्यकीय रजा, बाहेर सेवा, न्यायालय, आठवडी रजा यात गुंतली आहे. कार्यालयात ५ ते ६ पोलीस कार्यरत असतांना बिट मध्ये तपास आणि कार्य करणारी पोलीस नाहीत. या शिवाय महसूल विभागाची कामे त्यांचे मानगुटीवर असतांना वाढता तनाव आहे. अर्धे अधिक पोलीस तनावात काम करीत आहेत. रिक्त पदामुळे अतिरिक्त कामाचा त्याच कार्यरत कर्मचाºयांना देण्यात आलेला आहे. पोलीस चौकीत २४ तास पोलीस नियुक्त कार्यरत राहणार असल्याने रिक्त पदे भरण्याची गरज आहे.सिहोºयात पोलीसांची वसाहत होणारसिहोºयात विविध विभागाचे शासकीय कार्यालय आहेत. या कार्यालयात कोट्यवधी रुपये खर्चून कर्मचाºयांचे वसाहत बांधकाम करण्यात आले आहे. परंतु पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाºयांना वसाहत नाही. पोलीस ठाण्याचे हद्दीत जागा असतांना वसाहत बांधकामाची ओरड आहे. यामुळे पोलीसांची वास्तव्याची समस्या सुटणार आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी वसाहत बांधकाम मंजुर करण्याकरिता हालचालींना वेग देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.सिहोºयात जातीय सलोखा व सद्भावना बैठकसिहोरा पोलीसठाण्याच्या प्रागंणात जातीय सलोखा आणि सद्भावना बैठकीचे आयोजन जिल्हा पोलीस अधिक्षक विनिता शाहू यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, जिल्हा परिषद सभापती धनेंद्र तुरकर, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, माजी सभापती कलाम शेख, पंचायत समिती सदस्य गाढवे, पोलीस निरिक्षक प्रमोद बानबेले, मसरके उपस्थित होते. आयोजित बैठकीत गणेश चतुर्थीपासून अनेक सण साजरे केली जाणार आहे. या सणात जातीय सलोखा कायम सदभावना जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. या शिवाय कायम सद्भावना जोपासण्याचे आवाहन करण्यात आले. या शिवाय डिजे व मोपचे आवाजात समरता ठेवण्याचे सुचना करण्यात आल्या असून मडळांची नोंद करण्याचे माहिती देण्यात आली. संचालन राहुल डोंगरे यांनी तर, आभार प्रदर्शन प्रविण जाधव यांनी केले.

टॅग्स :Policeपोलिस