शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

अखेर कामांच्या चौकशीचे आदेश धडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 23:32 IST

तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या कामासंदर्भात बोगस बिले तयार केले आहेत.

ठळक मुद्देप्रकरण डोंगरला येथील : अवर सचिवांचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांना आदेश

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाने केलेल्या कामासंदर्भात बोगस बिले तयार केले आहेत. यात वृक्ष लागवड, रोपवाटीका तथा डोंगरला येथील उद्यानातील कामांचा समावेश आहे. या प्रकरणाची गंभीर दखल महाराष्ट्र शासनाचे अवर सचिवांनी घेतली असून त्यांची सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांना चौकशी करून संबंधितावर कायदेशिर कारवाईचे आदेश दिले आहे. या आदेशाने सामाजिक वनीकरण विभागात एकच खळबळ माजली आहे.एकच लक्ष्य दहा कोटी वृक्ष महत्वाकांक्षी उपक्रम राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार राबवित आहेत. लाखोंचा निधी येथे शासनाकडून दिला जात आहे. सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या बाजुला वृक्ष लागवड केली. वृक्ष लागवड कामांची माहिती फलकावर लिहिली, परंतु कामांची किंमत लिहिली नाही. प्रकरण तापल्यावर फलकावर किंमती नमूद करण्यात आल्या. वृक्ष लागवडीनंतर त्यासाठी लागणारे खत, किटकनाशक औषधे खरेदी करण्यात आली. ती बिले सुद्धा बोगस असल्याचे समजते. तुमसर, खापा व पचारा येथील विविध साहित्य व औषधे खरेदींची बिले घेण्यात आली.डोंगरला येथे स्व. उत्तमराव पाटील उद्यान तयार करण्यात येत आहे. हे उद्यान २४ हेक्टर मुरूमी जागेवर तयार करण्यात आले. प्रवेशद्वारापासून दोन्ही बाजूला रस्त्याला लागून मोठी नाली तयार करण्यात आली. खोदलेल्या नालीतील मुरूम रस्त्यावर घालण्यात आले. सागवान वृक्षांची येथे जूनीच लागवड केली आहे. येथे नोव्हेंबर महिन्यात झाडे लावण्यात आली. जून ते आॅगस्ट महिन्यात वृक्ष लागवडींचा नियम आहे. खेळांचे साहित्य भंगारात जाण्याची येथे वेळ आली आहे. उद्यान केवळ नावापुरतेच येथे दिसत आहे.रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडे शेवटची घटका मोजत आहेत. मजूरांच्या नावातही येथे घोळ असल्याची दाट शक्यता आहे. सामाजिक कार्यकर्ते कमलाकर निखाडे यांनी ‘आपले सरकार पोर्टल’वर तक्रार केली होती. याबाबत अवर सचिव विजय खेडेकर यांनी दखल घेत कारवाईचे निर्देश दिले.विभागावर जिल्हास्तरावर सामाजिक वनीकरण विभागाचे उपवनसंरक्षक अधिकारी आहेत. त्यांचे तालुकास्तरीय विभागावर नियंत्रण व देखरेख असते. येथे नियंत्रण व देखरेख नाही काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्राधिकारी एफ.एम. राठोड, उपवनसंरक्षक योगेश वाघाये तथा अन्य ग्रामस्थांसोबत एका आठवड्यापूर्वी आ. चरण वाघमारे यांनी डोंगरला येथे प्रत्यक्ष कामांची पाहणी व चौकशी केली. चौकशीत तांत्रिक त्रुट्या आ. चरण वाघमारे यांना आढळल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करून लक्षवेधी अधिवेशनात मांडणार असल्याचे आ. वाघमारे यांनी सांगितले.