शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर धान केंद्राचा शुभारंभ

By admin | Updated: November 7, 2016 00:44 IST

येथे हमी भाव - धान खरेदी केंद्राचा शुभारंभ विविध सेवा सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आला.

१६ गावांचा सहभाग : गोदाम मालकाची संमतीपालांदूर : येथे हमी भाव - धान खरेदी केंद्राचा शुभारंभ विविध सेवा सहकारी संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय कापसे, गोदाम मालक मुरलीधर कापसे, संचालक नत्थूजी खंडाईत, दयाराम हटवार, शालीक खंडाईत, किसन बडोले, कोठीराम भुसारी, शेतकरी वसंता हटवार आदी उपस्थित होते. यावेळी खरेदी पारदर्शक होण्याकरिता माहिती देण्याकरिता व प्रत्यक्ष लक्ष ठेवण्याकरिता जिल्हा मार्केटिंग फेडरेशनचे प्रतिनिधी बी.टी. पांडे, कृ.उ. बाजार समितीचे मनोहर झलके, किशोर भैसारे यांनी शेतकऱ्यांना व खरेदी केंद्रातील कर्मचाऱ्यांना, हमालांना सविस्तर माहिती दिली. अध्यक्षांनी एका एकरात १२ क्विंटल म्हणजे ८ खंडी धान खरेदी करण्याचे आदेश असल्याचे सांगितले. खरेदी केंद्रावर भ्रष्टाचाराला शेतकऱ्यांनी प्रतिसाद टाकावा असे आवाहन केले.संचालक नत्थूजी खंडाईत यांनी शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाची माहिती आम्हाला झाली आहे. दररोज सुमारे १५०० रुपयापर्यंत खरेदीचा मानस असून फारच कमी कालावधीत पेमेंटची सोय करण्यात येईल. तसेच १४७० रु. दराने ब दर्जात धान खरेदी करण्यात येईल. अ दर्जाबाबद जिल्हा मार्केटिंग अधिाकरी हनमंत पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेता येईल. संचालक दयाराम हटवार यांनी हमालीचा प्रश्न उचलत प्रती कट्टा ३ रुपये अधिक होत असून शासनही प्रति क्विंटल ७ रु. देतो आहे. तेव्हा शेतकऱ्यांचा विचार करावा असे विचार ठेवले. धान खरेदी केंद्रावर गर्दी होऊ नये, सुरळीत खरेदीकरिता लाखनी तालुक्यात हमी धान खरेदी केंद्रांना गाव वाटून दिले आहेत. पालांदूर धान खरेदी केंद्राअंतर्गत खराशी, खुनारी, लोहारा, नरव्हा, पाथरी, मरेगाव, वाकल, ढिवरखेडा, मेंगापूर, कवलेवाडा, निमगाव, पालांदूर, घोडेझरी, कवडसी, गोंदी अशी १६ गावांची धुरा ठेवली आहे. संस्थेच्या कोठाराची क्षमता ३५०० क्विंटल असून इतर दोन मोठी कोठारे भाडे तत्वाने मुरलीधर कापसे यांच्या मालकीचे घेतले आहेत. शेतकऱ्यांना कोठाराअभावाने होणारा त्रास टाळण्याकरिता शासनाकडे १४ लक्ष रु. २०११ पासून थकीत असूनही आज कोठार दिल्याने धान खरेदी पालांदुरात शक्य झाली. शेतकऱ्यांनी त्याचे उद्घाटनाप्रसंगी अभिनंदन केले. शासनानेही थकीत रक्कम त्वरीत देत धान खरेदी नियमित, पारदर्शकता व्हावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गानी व्यक्त केली. धान खरेदी वेळी सातबारा, आधारकार्ड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे खाता क्रमांक असणे अनिवार्य असल्याचे संस्थेचे सचिव सुनिल कापसे यांनी सांगितले. धानाचा ओलावा, वजन याविषयी माहिती देत धान खरेदी केंद्राचा अधिकृतरित्या ११ दिवसाच्या विलंबनाने शुभारंभ करण्यात आला. (वार्ताहर)