शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अखेर चौकशी समितीने केली आहाराची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 01:06 IST

पवनी तालुक्यातील पिलांद्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातो, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एकच खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत चौकशी समितीने पोषण आहाराची चाचपणी केली.

ठळक मुद्देशालेय पोषण आहार : पवनी तालुक्यातील पिलांद्री जिल्हा परिषद शाळा, शैक्षणिक साहित्यही होते कुलूपबंद

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील पिलांद्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा दिला जातो, याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच एकच खळबळ उडाली. वृत्ताची दखल घेत चौकशी समितीने पोषण आहाराची चाचपणी केली. यात चुका आढळल्याची माहिती आहे.यावेळी यामध्ये जिल्हा लेखाधिकारी मिनाक्षी शिवलकर, अधीक्षक शालेय पोषण आहार (पवनीचे) रविंद्र सलामे, विषय शिक्षक मिना गजभिये, केंद्र प्रमुख बी.आर. मेश्राम, विषयसाधन व्यक्ती व्ही.बी. रामटेके आदी अधिकारी यांनी शाळेतील वर्गावर्गात जावून चौकशी केली. तसेच रेकार्ड सुद्धा यावेळी तपासणी केली. चौकशीअंती व प्रभारी मुख्याध्यापक यांनी दिलेल्या लिखित पत्रानुसार तसेच अहवालानुसार योग्य ती कार्यवाही होणार असल्याचे मत यावेळी अधीक्षक रविंद्र सलामे पोषण आहार यांनी मांडले. शाळेतील कारभार विषयी चौकशी पाहणी केली. त्यात एक ना अनेक लहान मोठ्या त्रृट्या आढळल्या, रेकार्ड बरोबर नसल्याचेही आढळले. शासनातर्फे आलेला निधीचा वापरही झाला नसल्याचे बँक पासबुक वरून कळले. प्रभारी मुख्याध्यापकाच्या मते, धनादेशावर स्वाक्षरी करायला येथील शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष टाळाटाळ करतात. त्यामुळे पैसे विड्राल झाले नाही तर मुख्याध्यापक बिल आणत नाही आणि दाखवत नाही म्हणून स्वाक्षरी करत नसल्याची कबुली शालेय समिती अध्यक्षांनी दिली.आलेल्या समितीद्वारे प्रभारी मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षकांना समज देण्यात आली. विद्यार्थ्यांना यापुढे पोषण आहार दर्जेदार तथा नियमानुसार द्यावे, असेही सांगण्यात आले.ज्या प्रभारी मुख्याध्यापकावर ग्रामस्थांचा रोष होता त्यानेही यावेळी लिखित स्वरूपात वरिष्ठांना पत्र दिले. याच शाळेतील पुन्हा एक मोठा प्र्रकार प्रकाशात आला तो विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आलेले शैक्षणिक साहित्य आजपर्यंत कुलूपबंद होते. आजपर्यंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्यापासून वंचित राहावे लागले आहे. या साहित्याचा उपयोग शिक्षक तथा मुख्याध्यापक करत नसतील तर यात दोष कुणाचा, असाही सवाल उपस्थित करण्यात आला.शाळेत आलेल्या चौकशी समितीने घेतलेल्या निर्णयामुळे ग्रामस्थामध्ये आनंदाचे वातावरण आहे.-सुधाकर बारेकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा