शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ माजी सैनिकाला मिळाला मदतीचा हात

By admin | Updated: April 16, 2015 00:30 IST

भारतीय सैन्यातून देशसेवा केलेल्या नान्होरी येथील केवळराम लोणारे यांना तुटपुंजे सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे.

शासनस्तरावर पाठपुरावा करणार : दरमहा एक हजार रूपये मदतीचे अभिवचन भंडारा : भारतीय सैन्यातून देशसेवा केलेल्या नान्होरी येथील केवळराम लोणारे यांना तुटपुंजे सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. शासनाने दिलेली शेतजमीनही शासनाने परत घेतली. तेव्हापासून ते शेतीसाठी शासनाशी लढा देत आहे. या आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारला प्रकाशित केले. याची दखल घेत भंडाराचे आमदार अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी स्वत:च्या वेतनातून लोणारे यांना दरमहा एक हजार रूपये देण्याचे अभिवचन दिले. आ.रामचंद्र अवसरे हे आज बुधवारला ‘लोकमत’ जिल्हा कार्यालयात भेट देऊन लोणारे यांना हजार देऊन पहिला मदतीचा हाथ दिला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांची भेट घेऊन लोणारे यांची आपबिती सांगितली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे कागदपत्र मागवून न्याय देण्यात येईल असे सांगितले.लाखनी तालुक्यातील नान्होरी येथील केवळराम लोणारे हे सन १९६२ मध्ये सैन्यात असताना पाकिस्तानशी झालेल्ळा युध्दाचे साक्षीदार आहेत. कालांतराने प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांच्या देशसेवेची दखल घेऊन शासनाने त्यांना साकोली तालुक्यातील मोगरा येथे पाच एकर शेतजमीन दिली होती. मात्र, वनहक्क कायद्याखाली ती जमीन शासनाने परत घेतली. शासनाकडून त्यांना केवळ ८९२ रूपये सेवानिवृत्ती वेतन मिळत आहे. मागील ४३ वर्षांपासून शेतीसाठी ते शासनाशी लढत आहे. उदरनिर्वाह करताना त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परंतू त्यांना कुणाचेही सहकार्य मिळाले नाही. तुटपुंज्या वेतनात कुटुंबाची वाताहत होत असल्यामुळे केवळराम यांनी ‘लोकमत’ कार्यालय गाठून आपबिती सांगितली. त्यानंतर ‘लोकमत’ने ‘माजी सैनिकावर गृहपयोगी साहित्य विकण्याची वेळ’ या आशयाचे वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेऊन आ. अ‍ॅड.रामचंद्र अवसरे यांनी ‘लोकमत’ला फोन करून केवळराम यांची माहिती जाणून घेतली व त्यांना आर्थिक मदत देण्याची इच्छा व्यक्त केली. बुधवारला सकाळी आ.अवसरे यांनी केवळराम यांना बोलावून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी शासनाकडून त्यांना शेतजमीन मिळवून देण्याचे अभिवचन दिले. त्यानंतर लाखनीचे तहसीलदार पोहनकर यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर केवळरामची कैफियत सांगण्यासाठी त्यांना स्वत:चे वाहनात बसवून थेट जिल्हाधिकारी कार्यालयात गाठले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे शहर अध्यक्ष विकास मदनकर, शहर महामंत्री संजय मते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)