शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बोअरवेलची थकीत रक्कम मिळाली

By admin | Updated: September 17, 2015 00:32 IST

वर्षभर कार्यालयात हेलपाटे मारून बोअरवेलचे पेमेंट न मिळाल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याने चक्क प्रशासनाला आत्महत्येचे अल्टीमेट दिले होते.

अधिकारी धास्तावले : कागदपत्रांच्या पूर्ततेनंतरही अधिकाऱ्यांकडून उडवाउडवी पालांदूर : वर्षभर कार्यालयात हेलपाटे मारून बोअरवेलचे पेमेंट न मिळाल्याने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याने चक्क प्रशासनाला आत्महत्येचे अल्टीमेट दिले होते. याबाबत लोकमतने दि. ११ सप्टेंबरला वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच प्रशासनात खळबळ उडून अगदी चार दिवसात शेतकरी बशिरखाँ हफिजखाँ पठाण यांनी १६ हजार ५२८ रुपयांचा धनादेश ग्रामपंचायत पालांदूरला ग्रामविकास अधिकाऱ्यांमार्फत प्रदान करण्यात आला. पालांदूर येथील शेतकरी बशीर पठाण यांनी २०१३-१४ मध्ये महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिर व बोअरवेल खोदली. त्यासाठी लागणारे सर्व कागदोपत्री सोपस्कार ग्रामपंचायत पालांदूर मार्फत पूर्ण केले. मात्र, माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक, काम पूर्ण झाल्यानंतरही लाभार्थ्याला धनादेश देण्यास विलंब लागत होता. याबाबत लाभार्थ्याने तालुका, जिल्ह्या, आयुक्त कार्यालय नागपूरला पत्रव्यवहार केला. परंतु प्रशासनाला जाग आली नाही. कर्जाची रक्कम बोअरमध्ये खर्च झाल्याने शेतकरी आर्थिक खाईत खितपत पडला होता. विहिरीची रक्कम मिळाली. परंतु बोअरचे १६ हजार ५२८ एवढा निधी मिळाला नव्हता. तेव्हा अन्यायग्रस्ताने लोकमतकडे गाऱ्हाणी मांडली. लोकमतने लाभार्थ्याची बाजू वृत्तपत्रात प्रकाशित केली. वृत्त प्रकाशित होताच प्रशासन खळबळून जागे झाले आणि महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी च्या शिल्लक फंडातून १६ हजार ५२८ रुपयांचा धनादेश शेतकऱ्याला दिला. (वार्ताहर)