शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बावनथडी नदीपात्रात रेतीसाठी सीमांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 23:40 IST

बावनथडी नदी राज्याचे शेवटचे टोक आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा नदीने निश्चित केल्या आहेत. मध्यप्रदेश शासनाने बालाघाट जिल्ह्यातील सर्वच नदी घाटांचे लिलाव केले परंतु तुमसर तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नाही. तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार गावाजवळून बावनथडी नदी वाहते. नकाशावरून महाराष्ट्राच्या हद्दीत तालुका महसूल प्रशासनाने नदीपात्रात सिमेंट खांब काढून सीमा निश्चित केली आहे. 

ठळक मुद्देमहसूलची कारवाई : रेती चोरीवर आळा बसणार, नदीपात्रात रोवले खांब

मोहन भोयरलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सीमेवरून वाहणाऱ्या बावनथडी नदीपात्रात होणारी रेती तस्करी रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने नदीपात्रात सीमांकन निश्चित केले आहे. त्यासाठी नदीपात्रात सिमेंट खांब रोवण्यात आले असून महसूल प्रशासनाने प्रथमच ही कारवाई केली, हे विशेष.बावनथडी नदी राज्याचे शेवटचे टोक आहे. महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा नदीने निश्चित केल्या आहेत. मध्यप्रदेश शासनाने बालाघाट जिल्ह्यातील सर्वच नदी घाटांचे लिलाव केले परंतु तुमसर तालुक्यातील रेती घाटाचे लिलाव झाले नाही. तुमसर तालुक्यातील वारपिंडकेपार गावाजवळून बावनथडी नदी वाहते. नकाशावरून महाराष्ट्राच्या हद्दीत तालुका महसूल प्रशासनाने नदीपात्रात सिमेंट खांब काढून सीमा निश्चित केली आहे. नदीपात्र विस्तीर्ण आहे. दोन्ही राज्याच्या सीमेतील नदीपात्रात मोठा रेती साठा उपलब्ध आहे. मध्यप्रदेश शासनाने बालाघाट जिल्ह्यातील सर्वच रेतीघाटांचा लिलाव केला आहे. नदीपात्रात सीमा कुठून कुणाची सीमा सुरु होते हे कळत नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमेतून रेतीचे उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी तालुका महसूल प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. यावर महसूल प्रशासनाने दखल घेऊन नदीपात्रातील सीमा निश्चित केल्या.त्यामुळे रेती चोरीला आळा बसण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशातील बामणी, बोनकट्टा येथील सीमा महाराष्ट्रालगत आहेत. 

फिरत्या पथकाची गरज रेती चोरीला सीमांकनामुळे चाप बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यासाठी महसूल प्रशासनाने फिरते पथक नियुक्त करण्याची गरज आहे. रात्रीच्या सुमारास राज्याच्या हद्दीतून रेती उत्खनन होत असल्याची माहिती आहे. मध्यप्रदेश शासनाने रेती घाट लिलाव करताना क्षेत्र निश्चित केले नाही. त्यामुळे तेथील रेती कंत्राटदार संपूर्ण नदीपात्रातून रेतीचे उत्खनन करीत असल्याची माहिती आहे. 

 

टॅग्स :sandवाळू