शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

...अखेर ते बांधकाम दुसरीकडे हलविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:33 IST

पवनी तालुक्यातील चिचाळ येथील तलाठी भवन वास्तु बांधकामाला ग्रामपंचायतला विश्वासात न घेता कंत्राटदारांनी बगिच्यामध्ये बांधकामाला जागा उपलब्ध केली. सदर बांधकामाला ग्रामस्थ व उपसरपंचा मंजुषा गभणे बांधकाम अडविले.

ठळक मुद्देचिचाळच्या बगीचा प्रकरण : कंत्राटदाराकडून मिळणार नुकसानभरपाई

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : पवनी तालुक्यातील चिचाळ येथील तलाठी भवन वास्तु बांधकामाला ग्रामपंचायतला विश्वासात न घेता कंत्राटदारांनी बगिच्यामध्ये बांधकामाला जागा उपलब्ध केली. सदर बांधकामाला ग्रामस्थ व उपसरपंचा मंजुषा गभणे बांधकाम अडविले. सदर प्रकरणाची दखल तहसीलदार गजानन कोकुर्डे यांनी घटनास्थळाला भेट देवून सदर बांधकाम त्याच गटात दुसरीकडे हलविले व कंत्राटदाराला बगीचाची झालेली नुकसान भरपाई करुन देण्याचे आदेश दिले.पवनी तालुक्यातील चिचाळ येथे महात्मा गांधी गाव तंटामुक्त समिती पुरस्कारातून मागील सरपंचा उषा काटेखाये व महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष दिलीप रामटेके यांचे पुढाकाराने २ लक्ष ९७ हजार रुपयांचे गार्डनचे बांधकाम करण्यात आले. मात्र नव्याने विराजमान ग्रामपचांयत यांचे दुर्लक्षाने बगिच्यामध्ये गवताचे साम्राज्य झाले असून कित्येक झाडे वाळण्याच्या मार्गावर आहेत. गार्डनसाठी कित्येक लोकांनी सहभाग दिला. मात्र बगिच्यात पाण्याचीच व्यवस्था नसल्याने गार्डन दुर्लक्षीत झाले आहे.तालुक्यात चिचाळ हे गाव क्रमांक दोनचे गाव आहे. गावाला मंडळ अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय नसल्याने येथे आमदार निधीतून तलाठी भवनाचे बांधकाम मंजूर झाले आहे. सदर बांधकामासाठी कंत्राटदार यांनी गावात जागा उपलब्ध असतांनाही किंवा ग्रामपंचायतला विश्वासात न घेता गार्डनमधील जीवंत झाडे जाळून बगिच्याची रॅलींग तोडली. सदर घटनेचा गावात तिव्र रोष व्यक्त करुन ग्रामस्थांनी व उपसरपंचा यांनी कंत्राटदार यांना धारेवर धरुन तंबी देवून काम बंद केले. सदर प्रकरण चिघळत आहे, हे लक्षात येताच तहसीलदार गजानन कोकुर्डे यांनी घटनास्थळ गाठून संबंधीत स्थळाची मौका चौकशी करुन गट क्रमांक ९०५ मध्येसाईनाथ दुग्ध डेअरी शेजारील जागेत तलाठी वास्तूची जागा नियोजित करुन दिली व बगिच्याची नुकसान भरपाई कंत्राटराने पुर्ण करुन देणार अशी उपस्थितांना समोर सांगितले. यावेळी तहसीलदार गजानन कोकुर्डे यांनी घटनास्थळ गाठून संबंधीत स्थळाची मौका चौकशी करुन गट क्र. ९०५ मध्येच साईनाथ दुग्ध डेअरी शेजारील जागेत तलाठी वास्तूची जागा नियोजित करुन दिली व बगिच्याचे झालेले नुकसान भरपाई कंत्राटदाराने पूर्ण करुन देणार अशी उपस्थितांना समोर सांगितले.यावेळी तहसीलदार गजानन कोकुर्डे, मंडळ अधिकारी कावटे, पं.स. सदस्या मंगला रामटेके, उपसरपंचा मंजुषा गभणे, सरपंचा लोपमुद्रा वैरागडे, वर्षा काटेखाये, मोना तिभागेवार, अल्का काटेखाये, तंमुस अध्यक्ष श्रीकृष्ण काटेखाये, दिलीप रामटेके, दिनेश नंदपूरे, शामलाल रामटेके, निलेश काटेखाये, आशिष मेश्राम, प्रदिप भुरे, जगतराम गभणे व ग्रामस्थ उपस्थित होते.