शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मुख्यमंत्री पदावरून अंतर्गत कलह सुरू असतानाच सरकारचा मोठा निर्णय; २ शहरांची नावं बदलली
2
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
3
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
4
"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला... 
5
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापले रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाले- "त्याच्या हातातून..."
6
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
7
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
8
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
9
कठड्यावर धडकून बाईकखाली पाय अडकला अन...; दुचाकी पेटल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
10
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
11
आधार कार्ड दिलं नाही म्हणून काढली पँट; कावड यात्रेआधी ओळख पटवणाऱ्या लोकांवर भडकले ओवैसी
12
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
13
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
14
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
15
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
16
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
17
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
18
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
19
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
20
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या

अखेर बांधकाम स्थगितीचे आदेश!

By admin | Updated: December 13, 2014 00:59 IST

येथील गढकुंभली मार्गावर सुरू असलेले तहसील कार्यालयाचे बांधकाम थांबविण्यात यावे व जुन्याच ठिकाणी तहसील कार्यालय बांधण्यात यावे, ...

साकोली : येथील गढकुंभली मार्गावर सुरू असलेले तहसील कार्यालयाचे बांधकाम थांबविण्यात यावे व जुन्याच ठिकाणी तहसील कार्यालय बांधण्यात यावे, यासाठी साकोली येथे चार दिवसांपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या प्रकरणावर महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी संबंधित कामाला स्थगिती देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांना दिले असले तरी हे आदेश साकोलीच्या तहसीलदारांपर्यंत पोहचलेले नाही. या आशयाचा शेरा ना.खडसे यांनी निवेदनात नमूद केला असल्याचे आंदोलकांचे म्हणने आहे.साकोली तहसील कार्यालयाची नवीन ईमारत जुन्याच जागी बांधण्यात यावी व गडकुंभली मार्गावर सुरू असलेले बांधकाम थांबविण्यात यावे यासाठी साकोली येथे दि.९ रोजी साकोली बंद व धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशासनाने याची दखल न घेतल्याने या धरणे आंदोलनाचे रूपांतर बेमुदत साखळी उपोषणात करण्यात आले. या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस होता. माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते, शिवकुमार गणवीर, कैलास गेडाम, हेमंत भारद्वाज, काँग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष मार्कंड भेंडारकर हे नागपूर येथे अधिवेशनात गेले व त्यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन याप्रकरणाची कैफीयत मांडली व या प्रकरणाची आवश्यक कागदपत्रे देऊन निवेदन दिले. निवेदनानुसार महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी शेरा मारून जिल्हाधिकारी भंडारा यांना स्थगीती देण्यात यावी, असे निर्देश दिले. याची माहिती आंदोलकांना मिळताच साखळी उपोषण रद्द करण्यात आले. तसेच फटाक्यांची आतषबाजी करून ढोलताशांच्या गजरात शहरातून रॅली काढण्यात आली. यासंदर्भात दि. १५ रोजी मंडपस्थळी बैठक घेण्यात येणार आहे. (तालुका प्रतिनिधी)