लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत वाहणी अंतर्गत वांगी येथील एका लाभार्थ्याची घरकुलाची दूसºया हप्त्याची रक्कम सिहोरा येथील बँक शाखेने परस्पर सदर लाभार्थ्याच्या कर्जाच्या रकमेत रूपांतरीत केली. घरकुलाचे हप्त्यापासून वंचित केले. मात्र सदर लाभाथ्यार्ने जिल्हाधिकारी नरेश गिते यांचेकडे तक्रार करताच, त्यांनी संबंधीत यंत्रणेला याबाबत चौकशीचे निर्देश दिले.घरकुलाच्या हप्त्यापासून वंचित झालेल्या लाभार्थ्यास सिहोरा बँक शाखेने तातडीने लाभाची रक्कम त्याचे खात्यात वळती केली आहे. यापूढे जिल्ह्यातील कोणत्याही बँकांनी लाभार्थ्यांचे पिक कर्ज, पिक विमा किंवा अन्य कोणत्याही योजनांचा निधी परस्पर कर्जाच्या हप्त्यात कपात केल्यास त्यांचेवर कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.तुमसर तालुकयातील वाहनी ग्रामपंचायत अंतर्गत वांगी येथील पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थी संतोष फुटाणे या लाभार्थ्यांला घरकुल मंजूर झाल्यानंर सन २०१७-१८ मध्ये घरकुलाचे बांधकामाला सुरूवात केली. सदर लाभार्थ्याला यापूर्वी पहिला हप्ता मिळालेला असून दुसरा हप्त्याचे बांधकामाचे ३० हजार रुपये गट विकास अधिकारी पंचायत समिती तुमसर यांनी बँक आॅफ इंडिया सिहोरा शाखेत बँक खात्यावर वितरीत केलेले होते. परंतु बँक व्यवस्थापक यांनी सदर घरकुलाची लाभाची रक्कम लाभर्थ्याला न सांगता परस्पर कर्ज परतफेडीच्या हप्त्यात रूपांतरीत केली. त्यामुळे लाभार्थ्यास घरकुलाची रक्कम मिळालेली नाही. सदर लाभार्थी घरकुलाच्या हप्त्याच्या रक्कमेपासून वंचित झाल्याने घरकुलाचे बांधकाम करणे अडचणीचे ठरले. लाभार्थ्याने याबाबत आमदार चरण वाघमारे यांचेकडे तक्रार केलेली होती.आमदारांनी जिल्हाधिकारी यांना सदर लाभार्थ्यांच्या हक्काची रक्कम देण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आलेला होता. लाभार्थी संतोष फुटाणे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन देऊन घरकुलाचा हप्ता मिळवून देण्यासाठी साकडे घातले. जिल्हाधिकारी यांनी या बाबीकडे तातडीने लक्ष देवून हा प्रश्न निकाली काढलेला आहे.सदर लाभार्थ्याला त्याच्या हक्काची रक्कम मिळावी, याकरिता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा संचालक, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांना तातडीने निर्देश दिले होते. ६ आॅगस्ट जिल्हाधिकारी यांचे दालनात सदर प्रकरणाबाबत बैठक घेण्यात आली. बैठकीला अग्रणी बँकेचे व्यवस्थापक ब्रजेश कुमार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक प्रकल्प अधिकारी तुरस्कर यांची उपस्थिती होती.
अखेर घरकुल हप्त्याची रक्कम मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 01:18 IST
तुमसर तालुक्यातील ग्रामपंचायत वाहणी अंतर्गत वांगी येथील एका लाभार्थ्याची घरकुलाची दूसºया हप्त्याची रक्कम सिहोरा येथील बँक शाखेने परस्पर सदर लाभार्थ्याच्या कर्जाच्या रकमेत रूपांतरीत केली. घरकुलाचे हप्त्यापासून वंचित केले.
अखेर घरकुल हप्त्याची रक्कम मिळाली
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचा बँकेला दणका : लाभार्थ्यांचा निधी परस्पर कपात केल्यास होणार कारवाई