शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेतून रोहयोच्या कामाला अंतिम रुप

By admin | Updated: December 21, 2014 22:53 IST

केंद्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोहयो कायदयानुसार गावांमध्ये काय परिस्थिती आहे, लोकांची प्रश्न, समस्या, त्यांची गरज व सुधारणांसाठी उपाय जाणून घेण्यासाठी सर्वकष सहभागी नियोजन

करडी (पालोरा) : केंद्रशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय रोहयो कायदयानुसार गावांमध्ये काय परिस्थिती आहे, लोकांची प्रश्न, समस्या, त्यांची गरज व सुधारणांसाठी उपाय जाणून घेण्यासाठी सर्वकष सहभागी नियोजन प्रक्रियेचे (आयपीपीई) धोरण आखले आहे. या अंतर्गत मोहाडी तालुक्याची निवड झाली असून नियुक्त अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून १५ डिसेंबरपासून सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली आहे. ग्रामसभेतून नियोजित वार्षिक आराखड्याच्या नियोजनाला त्रुट्या व सुधारणांसह मंजुरी दयायची असून प्राधान्य क्रमानुसार विकासकामांना निधी दिली जाणार आहे. केंद्रशासन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदयानुसार सहभागी पध्दतीने गावातील विकास कामांचा नियोजन आराखडा तयार करण्यावर भर दिला आहे. प्रत्येक ग्रामपंचायत व गावासाठी खराखुरा नियोजन आराखडा तयार व्हावा, हा त्यामागचा उद्देश आहे. सर्वकष सहभागी नियोजन प्रक्रियेसाठी मग्रारोहयो मजूर, ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी, विशेषत: स्त्रिया व वंचीत गटातील सदस्य, पंचायत राज संस्थेचे प्रतिनिधी (सरपंच/ सदस्य), मग्रारोहयो अधिकारी, कर्मचारी, तांत्रीक अधिकारी, तालुका नियोजन समितीचे सदस्य व जिल्हा विकास समिती (डीपीसी)द्वारा नियुक्त प्रतिनिधी यांची जबाबदारी अधिक असून त्यांचेवरच प्रक्रियेच्या अंमलबजावणीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियोजन पध्दतीत मोहाडी तालुक्याची व त्यातील गावांची निवड झाली आहे. मग्रारोहयो अंतर्गत गावांसाठी वा ग्रामपंचायतीसाठी कामाचे नियोजन करण्याचा अधिकार आणि जबाबदारी गावकऱ्यांवर, विशेषत: ज्यांना रोहयो अंतर्गत कामे करायची आहेत. नियोजन आराखड्याच्या गुणवत्तेवर त्या गावातील विकास कामांची परिणामकारकता अवलंबून राहणार आहे.