शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

फुलोऱ्यावरील धान पीक मोजतेय अखेरची घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:58 IST

हाडाचे पाणी होईस्तोवर राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पुन्हा एकदा निसर्गाने पाणी फेरले आहे. धान फुलोºयावर असतांना २३ दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी पावसाअभावी कोरडवाहू शेतातील धानाचे पीक अखेरच्या घटका मोजत आहेत.

ठळक मुद्देपावसाची दडी, शेतकरी हतबल : पीक वाचविण्यासाठी शेतकºयांची केविलवाणी धडपड

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : हाडाचे पाणी होईस्तोवर राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पुन्हा एकदा निसर्गाने पाणी फेरले आहे. धान फुलोऱ्यावर असतांना २३ दिवसांपासून पावसाने दडी मारली. परिणामी पावसाअभावी कोरडवाहू शेतातील धानाचे पीक अखेरच्या घटका मोजत आहेत. जीवघेणे भारनियमन व पेट्रोल-डिझेलचे वाढलेले भाव त्यातच रॉकेल तुटवड्याने पीक वाचविण्यासाठी बळीराजाची धडपड सुरु आहे. चौहूबाजुने संकटांनी घेरलेला शेतकरी पाण्याअभावी वाळलेल्या शेतीकडे पाहून धडधडा रडत आहे.यावर्षी करडी परिसरात सुमारे ६ हजार हेक्टरवर धानाची रोवणी झाली. आॅगस्ट महिन्यातील दमदार पाऊस झाल्याने धानाचे पीक जोमाने झाले. शेतकऱ्यांनी खत, किटकनाशके व फवारणीचे काम आटोपून घेतले. घरात होते नव्हते व कर्जाने घेतेले पैसे शेतकºयांने चांगलया उत्पन्नाच्या अपेक्षेने खर्च केले. हिरवेकंच धानाचे पीक पाहून शेतकरीही हुरडून जायचा.आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात पोषण वातावरणाने हलक्या प्रतीचे धान फुलोºयावर आले. तर उच्च प्रतीचे भारी वाण गर्भधारणेच्या अवस्थेत आहे. मात्र, २६ आॅगस्टपासून पावसाने डोळे वटारले.बेपत्ता झालेल्या पावसाचा आज २३ वा दिवस असतांना पाण्याचा थेंबही पडला नाही. मोठ्या कष्टाने उभे केले धानाचे पीक हाती येण्याच्या अगोदरच निसर्गाने हिसकावून घेण्यास सुरुवात केली आहे. करडी परिसरात ऊन-सावलांच्या खेळ रोज सुरु आहे. निसर्गावर अवलंबून असलेली धानाची शेती प्रचंड तापमानाने तणस होण्याच्या मार्गाकडे जात असल्याचे दिसून येत आहे.हिरवेगाव रान आता पांढºया व कोरड्या रानमाळात रुपांतरीत तर होणार नाही ना, अशी भितीही व्यक्त केली जात आहे. सिंचनाच्या साधनाअभावी फुलोºयावर आलेले हलके धानाचे पीक तडफडून वाळले आहेत. तर आठवडाभर पाऊस न झाल्यास भारी धानही वाळून कोळसा होईल काय? इतकी भयाण स्थिती चौहीकडे आहे. सिंचनाची साधने असणारे व नसणारे शेतकरीही आता हतबल आहेत.वारंवार ब्रेकडाऊनने शेतकरी बेजारशेतकºयांनी निदान १६ तास वीज पुवण्यिाची मागणी केली असतांना १२ तास विजेची घोषणा करण्यात आली. परंतु अजूनही पुरेपुर १२ तास विजेचा पुरवठा होतांना दिसत नाही. फक्त १० तास वीज दिली जात आहे. २ तास वारवांरच्या ब्रेकडाऊनमुळे वाया जात आहेत. त्यातही रात्री अपरात्री केव्हाही ब्रेकडाऊन केले जात असल्याने शेतकरी पुरता वैतागला आहे.अनुदानावर डिझेल पंप दिले, रॉकेलही द्याशेतकºयांना सिंचनाची सोय करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून डिझेल पंप पुरविले आहेत. परंतु सरकारने रॉकेलचा कोटा कपात केलेला आहे. त्यामुळे रॉकेल मिळणे दुरापस्थ ठरत आहे. आता पेट्रोल व डिझेलचे भावही वाढल्याने तासाकाळी डिझेलवर होणाºया खर्चात मोठी वाढ झालेली आहे. शासनाने अनुदानावर दिलेल्या डिझेल पंपाप्रमाणे रॉकेलचा पुरवठाही अनुदानावर करावा, अशी मागणी सरपंच महेंद्र शेंडे यांनी केली आहे.