लिनाराम हातझाडे (४५) रा. एकोडी असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी खेकडे पकडण्यासाठी जाताना शेताच्या तार कुंपणातील वीज प्रवाहाचा धक्का लागून माणिक ढेकल भैसारे (५०) रा. एकोडी याचा मृत्यू झाला होता. हातझाडे यांनी एकोडी येथे शेती मक्त्यावर घेतली आहे. शेतात या वर्षी दसाची लागवड करण्यात आली. मात्र वन्यप्राणी नासधूस करत असल्याने शेताच्या सभोवताली तारेचे कुंपण केले. मात्र रात्री वन्यप्राणी शेतात शिरत असल्याने त्यांनी तार कुंपणात वीज प्रवाह सोडला. हा प्रकार माहीत नसल्याने माणिक भैसारे याचा तारेला स्पर्श झाला आणि त्यातच मृत्यू झाला. माणिकच्या मृत्यूला जबाबदार धरून पोलिसांनी शेतकरी हातझाडे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून रात्री अटक केली. तपास पोलीस निरीक्षक जितेंद्र बोरकर करीत आहेत.
शेतकऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:36 IST