शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्यांवर दगडफेक करणाऱ्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 12:13 IST

Bhandara News संरक्षित जंगलातील बिबट्याच्या जोडीवर दगडफेक करण्याच्या प्रकरणात वनविभागाने एका व्यक्तीविरुद्ध वन्यजीव अधिनियमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपवनारखारी संरक्षित जंगलातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : संरक्षित जंगलातील बिबट्याच्या जोडीवर दगडफेक करण्याच्या प्रकरणात वनविभागाने एका व्यक्तीविरुद्ध वन्यजीव अधिनियमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील नाकाडोंगरी वन परिक्षेत्रातील पवनारखारी जंगलात बिबट्याला दगड मारण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे वन्यप्रेमीत तीव्र संपात व्यक्त करण्यात आला. अखेर वनविभागाने कारवाई करून तपास सुरू केला आहे.

नरेंद्रकुमार माणिक देशपांडे (रा. गोबरवाही) असे दगडफेक प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. ८ ऑगस्टला नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील पवनारखारीच्या डोंगरी कक्ष क्रमांक ८ मध्ये झाडावर बसलेल्या दोन बिबट्यांवर दगडफेक करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे वन विभागात एकच खळबळ उडाली. या व्हिडिओत पाचजण दिसत होते. त्यापैकी दोघांनाही बिबट्याच्या दिशेने दगडफेक केली असे दिसते. या प्रकरणाची तक्रार वाईट फाउंडेशन टायगर सेलकडे करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस व वनविभाग खडबडून जागा झाला. अखेर दगडफेक करणाऱ्या नरेंद्रकुमार माणिक देशपांडे याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वये शिकारीचा प्राथमिक गुन्हा दाखल केला.

या प्रकरणाचा तपास उपवनसंरक्षक एस. बी. भलावी, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी एस. एन. शेंडे यांच्या मार्गदर्शनात नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी नीतेश धनविजय आणि वनरक्षक ए. एन. पवार करत आहेत.

बिबटा हल्लाप्रकरण दिल्ली दरबारी

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील संरक्षित वनात बिबट्यावर दगडफेक प्रकरणाची दिल्ली येथील वाईल्ड लाईफ संस्थेने दखल घेतली आहे. त्यामुळे वनविभागात एकच खळबळ उडाली असून जंगलाच्या अधिवासात राहणाऱ्या वन्यप्राण्यांवर दगडफेक कशी करण्यात आली, याची गंभीर दाखल घेतली आहे. त्या अनुषंगाने कारवाई करण्यात आल्याचे बोलले जात आहे. इतर चार जण कोण आहेत व त्यांची भूमिका कोणती याची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती आहे. संरक्षित वनात वाहन उभे कसे केले, याचाही तपास सुरू असल्याची माहिती आहे.

टॅग्स :leopardबिबट्या