शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

कडंूवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: April 1, 2016 01:14 IST

मंत्रालयातील आदिवासी उपसचिवाला आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या दालनात जावून शिवीगाळ करीत मारहाण केली.

तहसीलदारांना निवेदन : आदिवासी संघटनेची मागणीतुमसर : मंत्रालयातील आदिवासी उपसचिवाला आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या दालनात जावून शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यामुळे आदिवासी बांधवांच्या भावना दुखावल्या गेले. तालुक्यातील आदिवासी संघटनेने घटनेचा निषेध केला आहे.ा त्यांच्याविरोधात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी संघटनांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.२९ मार्च रोजी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा.र. गावित दालनात बसले होते. तिथे जावून आमदार कडू यांनी गावित यांना अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करून त्यांच्या कपाळावर जबर मारहाण केली होती. त्या विरोधात मंत्रालयातील कर्मचाऱ्याने एक दिवस काम बंदही केले होते. त्या घटनेचे तीव्र पडसाद आदिवासी समाजात पडले आहे. अशा गुन्हेगारी प्रवृतीच्या प्रतिनिधीवर प्रतिबंध घालावा. अनुसूचित जाती, जमाती कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्यात यावी, याकरिता भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशोक उईके यांच्या नेतृत्वात तालुक्यातील आदिवासी विद्यार्थी संघ, कर्मचारी संघ, पिपल्स फेडरेशन, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व आदी संघटनेने तहसीलदार तुमसर यांना निवेदन सोपवले.यावेळी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, दिनेश मरसकोल्हे, रामेश्वर धुर्वे, नरेंद्र मडावी, विकास मरसकोल्हेसह असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)