शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संघटनेच्या आमरण उपोषणाचा पाचवा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 22:04 IST

येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी व अण्णा हजारेंच्या दिखाऊ व खोट्या उपोषणाच्या निषेधार्थ २८ जानेवारीपासून आमरण उपोषण चालू असून, मागिल पाच दिवसापासून उपोषणकर्ते कडाक्याच्या थंडीत उपोषण मंडपात ठाण मांडून आहेत. मात्र अद्यापही लोकप्रतिनीधी व निष्ठुर प्रशासनाला जाग येत नाही.

ठळक मुद्देनिष्ठुर प्रशासनाला पाझर फुटेना : कडाक्याच्या थंडीत उपोषणकर्ते काढताहेत रात्र

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदुर : येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी, शेतमजूरांच्या प्रश्नांसाठी व अण्णा हजारेंच्या दिखाऊ व खोट्या उपोषणाच्या निषेधार्थ २८ जानेवारीपासून आमरण उपोषण चालू असून, मागिल पाच दिवसापासून उपोषणकर्ते कडाक्याच्या थंडीत उपोषण मंडपात ठाण मांडून आहेत. मात्र अद्यापही लोकप्रतिनीधी व निष्ठुर प्रशासनाला जाग येत नाही.मागील पाच दिवसापुर्वी महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रियंक बोरकर यांच्या नेतृत्वात मध्यप्रदेश व छत्तीसगढ प्रमाणे शेतकऱ्यांच्या धानाला अडीच हजार रुपए हमीभाव द्यावा अथवा ७५० रुपये बोनस जाहीर करावे. तसेच महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायतीमध्ये बंद असलेली रोजगार हमी योंजनेची कामे पुर्ववत करावी या मागण्यांसाठी २८ जानेवारीला गांधी चौक लाखांदुर ते तहसील कार्यालयापर्यत १० हजार शेतकरी, शेतमजूरांच्या संख्येने महामोर्चा निघाला होता. मोर्चा आटपल्यानंतर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी, शेतमजूर महिलावगार्ने नविन बस स्टाँप समोरील कृषी प्रदर्शनीच्या मैदानावर आमरण उपोषण चालू केले असून, आजमितीला या उपोषण आंदोलणाचा सहावा दिवस आहे.गेल्या आठवड्यात अवकाली पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. अशाही स्थितीत जवळपास दोनसे महिला, पुरूष व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपोषण मंडपात ठाण मांडून आहेत. मात्र अद्यापही प्रशासन व लोकप्रतिनीधींनी याकडे लक्ष वेधले नाही.दरम्यान २८ जानेवारी रोजी राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार मधुकर कुकडे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन शासन दरबारी पाठपुरवा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सत्ताधारी पक्षाच्या अजुन एकाही लोकप्रतिनीधींनी उपोषण मंडपाला भेट दिली नाही.उपोषणकर्त्यांच्या जोपर्यंत प्रशासनाचे लोकप्रतिनीधी येऊन आम्हच्या मागण्या पुर्ण करत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याचे सांगितले. एवढेच नाही तर शनिवारपर्यत (ता.२) मागण्या मंजूर न केल्यास लोकप्रतिनीधींच्या विरोधात धिक्कार मोर्चा व रास्ता रोको आंदोलणाचा इशारा देखील उपोषणकर्त्यांनी दिला आहे.