शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव ट्रकने वृद्धाला चिरडले

By admin | Updated: June 25, 2017 00:14 IST

दुचाकीने घरून शेताकडे जात असताना साकोलीकडून भंडाराकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.

लाखनी येथील घटना : अपघाताची श्रृखंला थांबता थांबेनालोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : दुचाकीने घरून शेताकडे जात असताना साकोलीकडून भंडाराकडे जाणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत एका ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील लाखनी येथील जयस्तंभ चौकात घडली. लक्षमण पाटील बकाराम गायधनी (७०) असे मृत वृद्धाचे नाव आहे. गायधनी हे शनिवारला सकाळी घरून जयस्तंभ चौकातून दुचाकीने शेताकडे जात होते. दरम्यान चौकाच्या मध्यभागी दुचाकी भरधाव ट्रक (डब्ल्यू बी ४८०४) च्या चाकाखाली ते आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर पंचनामा करून ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनाानंतर मृतदेह कुटूंबीयांना देण्यात आला. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, मुलगी असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविला आहे.उड्डाणपूल केव्हा होणार?लाखनी येथील चौकात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याठिकाणी यापूर्वी अनेक अपघात होऊन अनेकांचा जीव गेला आहे. याठिकाणी मागीलवर्षी उड्डानपुलाचे भूमिपूजन करण्यात आले परंतु कामाला अद्यापपर्यंत सुरूवात झालेली नाही. त्यामुळे आणखी किती जणांना जीव गमवावा लागेल असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे.