शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

खत लिंकिंग प्रकरण पोहोचले कृषी आयुक्तांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2022 05:00 IST

खासदार अमोल कोल्हे यांनीही राज्याच्या कृषी आयुक्त धीरजकुमार यांना पत्र लिहीत खत लिंकिंग करणाऱ्या संबंधित कंपन्यांना जबाबदार धरीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे म्हटले आहे. तद्वतच लाखांदूर तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनने कोरोमंडल इंटरनेशनल या कंपनीचे खत आता तालुक्यात घेणार नाही व ते विकणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे. कृषी केंद्र संचालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा हा प्रयत्न असल्याचेही कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामाचा फायदा उचलत रासायनिक खत कंपन्यांनी साधारण खतासोबत मागणी नसलेल्या खतांचीही लिंकिंग मोठ्या प्रमाणात केली. सव्वा लाखाच्या खतासोबत सहा लाखांची खते लिंकिंग म्हणून पाठवण्यात आली. हे प्रकरण चांगलेच गाजत असून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने नोटीस जारी केल्यानंतर आता थेट राज्याच्या कृषी आयुक्तांनाही चौकशीसाठी पत्र पाठविण्यात आले आहे.यासाठी खासदार अमोल कोल्हे यांनी पुढाकार घेतल्याचे समजते. परिणामी रासायनिक खतांची लिंकिंग करणाऱ्या कंपनीच्या अडचणीत अधिकच वाढ होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे लाखांदूर ॲग्रो डीलर असोसिएशनने कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीचे खत यानंतर लाखांदूर तालुक्यात आम्ही घेणार नाहीत, असा प्रस्ताव घेत निर्णयही घेतला आहे. रासायनिक खत कंपन्या यावर्षीही मुख्य खतासोबत अन्य खत लिंकिंग करीत आहेत. दहा दिवसांपूर्वीच कोरोमंडल इंटरनॅशनल या खत कंपनीचे दोन रॅक आले होते. त्यात डीएपी खताची मात्रा अधिक होती. सोबतच लिंकिंगचे खत घेणेही शेतकऱ्यांना बंधनकारक करण्यात आले होते. या संदर्भात जिल्हा ऍग्रो असोसिएशनने पुढाकार घेत या जुलमी खत लिंकिंगची तक्रार केली होती. शेतकऱ्यांनाही मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याने ते अडचणीत सापडले आहेत. अशा स्थितीत खासदार अमोल कोल्हे यांनीही राज्याच्या कृषी आयुक्त धीरजकुमार यांना पत्र लिहीत खत लिंकिंग करणाऱ्या संबंधित कंपन्यांना जबाबदार धरीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे म्हटले आहे. तद्वतच लाखांदूर तालुका ॲग्रो डीलर असोसिएशनने कोरोमंडल इंटरनेशनल या कंपनीचे खत आता तालुक्यात घेणार नाही व ते विकणार नाहीत, असा पावित्रा घेतला आहे. कृषी केंद्र संचालकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शेतकऱ्यांना लुबाडण्याचा हा प्रयत्न असल्याचेही कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. 

आयुक्त कारवाई करणार काय?

- राज्याचे शिक्षण आयुक्त काम सांभाळलेल्या धीरज कुमार हे सध्या कृषी विभागाचे आयुक्त म्हणून कार्यभार पाहत आहेत. परखड निर्णय घेण्यात ते अग्रेसर असून रासायनिक खताच्या लिंकिंगवरही ते योग्य व सत्य निर्णय देतील, अशी आशाही शेतकरी बाळगून आहेत. कृषी आयुक्तांकडे थेट तक्रारी झाल्याने रासायनिक खतांची लिंकिंग करणाऱ्या कंपनीची आता खैर नाही, अशीही चर्चा सुरू झाली आहे.

 

टॅग्स :agricultureशेती