शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या निकालात मुलींची भरारी

By admin | Updated: May 29, 2017 00:15 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या वतीने (सीबीएसई) रविवारी इयत्ता बारावीचा निकाल घोषित करण्यात आला.

तुमसरची अपेक्षा पटले जिल्ह्यात प्रथम : निकाल केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचालोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या वतीने (सीबीएसई) रविवारी इयत्ता बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. यात तुमसर येथील शिरिनभाई नेत्रावाला शाळेची विद्यार्थीनी अपेक्षा पटले हिने जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला. तिला ९३.६० टक्के गुण प्राप्त झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे यावर्षीही बारावीच्या निकालात मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येते.महर्षी विद्या मंदिर, भंडाराभंडारा : येथील महर्षी विद्या मंदिर शाळेतून एकुण १४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यापैकी सर्वच विद्यार्थी पास झालेत. शाळेचा निकाल १०० टक्के लागला. वाणिज्य शाखेचा विद्यार्थी मिहीर राजेंद्र अग्रवाल या विद्यार्थ्याने ९०.९४ टक्के गुण प्राप्त करुन शाळेतून प्रथम क्रमांक प्राप्त केला. विज्ञान शाखेची विद्यार्थीनी हर्षा अतुल वैद्य हिने ७६.४० टक्के गुण प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य श्रृती ओहळे व पालकांनी कौतुक केले आहे. युएसए विद्यानिकेतन, तुमसरतुमसर : येथील युएसए विद्यानिकेतन शाळेच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. युती रहांगडाले या विद्यार्थीनीने ९० टक्के गुण प्राप्त करुन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला. मुस्कान माधवाणी हिने ८८ टक्के गुण प्राप्त केले. मुस्कान जैन व रिया पोटफोडे यांनी अनुक्रमे ८२.२० टक्के व ८२ टक्के गुण प्राप्त केले आहेत.शिरीनभाई नेत्रावाला, तुमसरतुमसर : येथील शिरीनभाई नेत्रावाला शाळेच्या पाच विद्यार्थीनींनी ९० टक्क्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे. यात प्रथम क्रमांकावर अपेक्षा पटले असून तिने शाळासह जिल्ह्यात प्रथम क्रमाक प्राप्त केला आहे. यानंतर रिया ढगे ९२.८० टक्के, ओशी शर्मा ९१.८० टक्के, शुभम राऊत ९१.२० टक्के तर मनस्वी पंचभाई हिने ९१ टक्के गुण प्राप्त केले आहे. सनफलॅग स्कूल, वरठीवरठी : येथील सनफलॅग शाळेतील राघव बजाज या विद्यार्थ्यांने गणीत या विषयात ९५ टक्के गुण प्राप्त केले आहेत. या शाळेतून २३ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. तृप्ती बाभरे हिने इंग्रजी विषयात ९३ टक्के तर अभिजित मोहरकर या विद्यार्थ्याने रसायनशास्त्र विषयात ९१ टक्के गुण प्राप्त केले आहे.सनिज् स्प्रिंग डेल, भंडाराभंडारा : शहरातील कृष्णनगरी येथे स्थित सनिज् स्प्रिंग डेल शाळेचा निकाल ८७ टक्के लागला. या शाळेतून प्रणय तेजराम आस्वले या विद्यार्थ्यांने ८८.४० टक्के गुण घेवून प्रथम स्थान प्राप्त केले. द्वितीय क्रमांक सिध्देश रासेगावकर याने प्राप्त केला त्याला ८६ टक्के गुण मिळाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य अनघा पदवाड, सचिव सुनिल मेंढे व पालकांनी कौतुक केले आहे.