शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मादी बिबट नवजात पिलांकडे फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:31 IST

ऊसाच्या शेतात लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांची आई चौथ्या दिवशीही पिलांकडे फिरकली नाही. परिणामी, ही नवजात पिले सुरक्षित असली तरी आईच्या दुधापासून मुकलेली आहे. त्यामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे.

ठळक मुद्देवनविभागाची चिंता वाढली : पाचव्या दिवशीही आई-पिले दूरदूरच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ऊसाच्या शेतात लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांची आई चौथ्या दिवशीही पिलांकडे फिरकली नाही. परिणामी, ही नवजात पिले सुरक्षित असली तरी आईच्या दुधापासून मुकलेली आहे. त्यामुळे वनविभागाची चांगलीच दमछाक होत आहे.कोका अभयारण्यालगतच्या नवेगाव येथील ऊसाच्या शेतात एका २० ते २५ दिवसांपूर्वी एका मादी बिबटने दोन पिलांना जन्म दिला होता. याची माहिती मिळताच वनविभाग या बिबटवर आणि पिलांवर लक्ष ठेऊन होता. दरम्यान, ज्या शेतकऱ्याच्या शेतात या मादी बिबटने पिलांना जन्म दिला, त्या शेतात बुधवारला आग लागली. त्यानंतर वनअधिकारी व कर्मचाºयांनी पुढाकार घेऊन पिलांना आगीपासून वाचविले. चार दिवसांपासून ही पिले वनविभागाच्या नजरेत असून सुरक्षित आहेत.या पिलांना जुन्नर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.देशमुख आणि नागपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरूण खोलकुटे यांच्या मार्गदर्शनात पिलांची काळजी घेण्यात येत आहे. असे असले तरी ही मादी बिबट पिलांजवळ न आल्यामुळे वनविभागाची चिंता तासागणिक वाढत आहे.पिले सुरक्षित पण... धोका कायमचऊसाच्या शेतात आढळलेली ही पिले २० ते २५ दिवसांची आहेत. या पिलांना लहान बाळांना देण्यात येणारे ‘लॅक्टोजिन इंनफंट’ हे दूध देण्यात येत असल्यामुळे ही पिले सुदृढ असली तरी हे दूध आईच्या दुधापेक्षा अधिक पोषक नाही. त्यामुळे ही मादी बिबट या पिलांपर्यंत येईपर्यत या पिलांची काळजी घेताना धोका कायम आहे. या पिलांना जंतुसंसर्ग होऊ नये, यासाठी हातात ग्लोज लावूनच पिलांना हाताळण्याच्या सूचना डॉ.देशमुख यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार या पिलांची काळजी घेण्यात येत आहे. ही मादी बिबट या पिलांना घेऊन जात नाही, तोपर्यंत वनविभागाला या पिलांची सुश्रुषा करावी लागणार आहे.मचान उभारलीमादी बिबटने ज्याठिकाणी या पिलांना जन्म दिला होता, त्याठिकाणच्या सभोवताल सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. याशिवाय नजर ठेवण्यासाठी मचान उभारण्यात आली आहे. कोका वनविभागात येणारे वनकर्मचारी आणि वनमजुरांना दिवस व रात्र पाळीत नेमण्यात आले आहे. हे सर्व अधिकारी पाळतीवर असले तरी या विभागाचे प्रमुख अधिकाºयाने अद्याप घटनास्थळावर भेट दिली नसल्याची चर्चा आहे.