शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर्गत हेवेदावे विसरून संघटित व्हा

By admin | Updated: September 6, 2016 00:26 IST

आगामी भंडारा नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणायचे आहे.

प्रफुल्ल गुडधे पाटील : काँग्रेस कमिटीची कार्यकर्ता बैठकभंडारा : आगामी भंडारा नगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणायचे आहे. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये असलेले मतभेद दूर झाले पाहिजे. सर्वांनी पक्षासाठी एकत्र येवून निवडणूक लढायची आहे. कोणत्याही भुलथापांना न पडता नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज राहा असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी व्यक्त केले.भंडारा शहर काँग्रेस कमिटी व तालुका काँग्रेस कमिटीची कार्यकर्ता सभा मुस्लिम लायब्ररी सभागृहात रविवारला पार पडली. यावेळी ते बोलत होते. भंडारा नगरपरिषदेच्या निवडणुकीतून ही सभा आयोजित केल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले होते. या बैठकीसाठी माजी आमदार आनंदराव वंजारी, विधानसभा प्रभारी मुजीब पठाण, काँग्रेस कमेटी सचिव डॉ.आसावरी देवतळे, महासचिव जिया पटेल, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजकुमार मेश्राम, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष अनिक जमा पटेल, वैद्यकीय सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनोद भोयर, जिल्हा महासचिव मनोज बागडे, नगरपरिषद पक्ष नेता शमीम शेख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी आनंदराव वंजारी यांनी नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वॉर्डनिहाय पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या तयार करून पक्ष संघटन मजबूत करावे, निवडणूक प्रक्रियेदरम्यान पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यकर्त्यांनी काम करावे असे प्रतिपादन केले. यावेळी मुजीब पठाण यांनी ही निवडणूक पक्षासाठी महत्वाची असून निवडणूक निकाल पक्षाच्या बाजूने लागावा यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे असे प्रतिपादन केले. जिया पटेल यांनी घराघरात काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असून पक्षाला संपवू असे खोचक बोलणाऱ्या विरोधी पक्षाला हात दाखविण्याची ही संधी कार्यकर्त्याने गमावू नये. कार्यकर्त्यांनी एकमेकावर विश्वास ठेवून शहर पिंजून काढावे, असे प्रतिपादन केले. प्रेमसागर गणवीर यांनी, अच्छे दिन व काळ्या धनाचे आणि जनधन योजनेचे स्वप्न दाखविणाऱ्यांना जनतेने सत्तेत बसविले. मात्र सार्वजनिक विकासाचे व प्रगतीचे कार्य करू न शकल्याने आता जनताच त्यांना धडा शिकवेल. ही संधी भंडारा नगरपालिकेतून मिळणार असल्याने पालिकेवर काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रत्येकांनी पक्षाचे काम करावे, असे प्रतिपादन केले. यावेळी सय्यद शादाब अली, मो.वकार शेख, मो.वसी शेख, सय्यद अहेतेशाम अली, सलमान खान, जुनेद शेख, फरहान शेख, साहील बर्वे, बादल कनोजे, अखिल तांडेकर, विकास तांडेकर, अजय तांडेकर, राकेश तांडेकर, अनुग्रह बर्वे, धीरज बर्वे, आशिष बर्वे, आकाश बिंझाडे, सूरज कुंभरे, पंकज तांडेकर, विक्की बरयेकर, रोहित धकाते आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. या बैठकीचे प्रास्ताविक सचिन घनमारे यांनी केले. संचालन राजकपूर राऊत, आभार शर्मिल बोदेले यांनी मानले. यावेळी नगरसेवक पृथ्वीराज तांडेकर, महेंद्र निंबार्ते, जि.प. सदस्य प्रेमदास वनवे, शेख नवाब, गणेश निमजे, अभिजीत वंजारी, सुभाष बोरकर, सय्यद रियाज अली, सय्यद शाहीद अली, दुर्गा फुलसुंगे, कुंदा वाघाडे, श्वेता मुटकुरे, पराग खोब्रागडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)