शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

जीवाच्या भीतीपोटी बिबट्याचा बाथरूममध्ये तीन तास मुक्काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:00 IST

शनिवारी एक बिबट रात्री ७ वाजताच्या सुमारास चिचगाव येथील लोकवस्तीत शिरला. यावेळी बिबट्याने बळीराम दोनाडकर नामक एका शेतक-याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करीत त्याची शिकार केली. ही बाब शेळीपालक कुटुंबासह गावक-यांना दिसून येताच बिबट्याला हाकलून लावण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी घाबरलेल्या बिबट्याने स्वत:च्या बचावासाठी सीताराम वटी नामक इसमाच्या घराशेजारील बाथरूममध्ये आश्रय घेतला. 

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : रात्रीच्या सुमारास शिकारीसाठी गावात शिरलेल्या बिबट्याने शेळीची शिकार केली. ही बाब लक्षात येताच ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. जीवाच्या भीतीपोटी बिबट्याने तब्बल तीन तास बाथरूममध्ये मुक्काम केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील चिचगाव येथे शनिवारी घडली. लाखांदूर येथील वनकर्मचारी व पोलिस प्रशासनाच्या पुढाकारात बिबट्याने सुखरूप जंगलाकडे धूम ठोकल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास सोडला. ही घटना तालुक्यातील चिचगाव येथे १६ ऑक्टोबर रोजी रात्री ७ ते १० वाजताच्या सुमारास हे थरारनाट्य घडले.तालुक्यातील चिचगाव येथील जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात बिबटसह अन्य वन्यजिवांचा वावर आहे. या जंगलातून काही वन्याप्राणी रात्रिच्या सुमारास शिकारीसाठी गावाकडे कुच करीत असतात. शनिवारी एक बिबट रात्री ७ वाजताच्या सुमारास चिचगाव येथील लोकवस्तीत शिरला. यावेळी बिबट्याने बळीराम दोनाडकर नामक एका शेतक-याच्या गोठ्यात बांधलेल्या शेळीवर हल्ला करीत त्याची शिकार केली. ही बाब शेळीपालक कुटुंबासह गावक-यांना दिसून येताच बिबट्याला हाकलून लावण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी घाबरलेल्या बिबट्याने स्वत:च्या बचावासाठी सीताराम वटी नामक इसमाच्या घराशेजारील बाथरूममध्ये आश्रय घेतला.  बिबट बाथरूममध्ये शिरल्याने गावकऱ्यांनी याची माहिती लाखांदूर वन विभागासह पोलीस प्रशासनाला दिली. माहितीवरुन सहायक वन संरक्षक आर. पी. राठोड व वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित यांच्या मार्गदर्शनात वनरक्षक एस. जी. खन्डागळे, एम. ए. भजे, बी. एस. पाटील, एम. एस. चांदेवार, मेश्राम, डनदार, बडोले सह पोलिस निरिक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस उपनिरीक्षक संदीप ताराम, पोलिस अंमलदार मनिष चव्हाण यासह अन्य पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थाळ गाठले.वन अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळावरून नागरिकांची गर्दी दूर केली. लोकांची गर्दी दूर होताच बाथरूममध्ये असलेल्या बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार केल्याची ही या महिन्यातील चिचगाव जंगल परिसरातील दुसरी घटना आहे. यापूर्वी गत आठवड्यापूर्वी तालुक्यातील सोनी येथे एका बोकडाची शिकार बिबट्याने केली होती.

सतर्कतेचे आवाहन- गत काही दिवसांपासून तालुक्यातील जंगल परिसरात मानव व वन्यजीव संघर्षाच्या घटनेत वाढ दिसून येत आहे. या परिस्थितीत जंगल परिसरातील नागरिकांनी हा संघर्ष टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन लाखांदूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी रुपेश गावीत यांनी केले आहे.

 

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग