शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

महालगाव नहराचा 'आऊटलेट' कोसळण्याची भीती

By admin | Updated: September 17, 2015 00:38 IST

मध्यम प्रकल्प चांदपुर जलाशयाच्या डाव्या कालव्याला महालगाव शिवारातील शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्यासाठी नहर जोडण्यात आलेला आहे.

अद्याप दुरुस्ती नाही : पाणी वाटप प्रभावित होणार चुल्हाड (सिहोरा) : मध्यम प्रकल्प चांदपुर जलाशयाच्या डाव्या कालव्याला महालगाव शिवारातील शेतकऱ्यांना पाणी वाटप करण्यासाठी नहर जोडण्यात आलेला आहे. या नहरांचा मुख्य आऊटलेट कोसळण्याची भीती निर्माण झाली असून पाच गावात पाणी वाटप प्रभावित होणार आहे.मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी सिहोरा परिसरात डावा आणि उजवा कालव्याची निर्मिती करण्यात आली आहे. या मुख्य कालव्यांना मोठे नहर तथा पादचाऱ्या जोडण्यात आले आहेत. डावा कालवाअंतर्गत वारपिंडकेपार, महालगाव, ब्राह्मणटोला, देवसर्रा, बपेरा, सुकडी (नकुल) गोंडीटोला गाव शिवारातील शेतीला पाणी वाटप करण्यासाठी महालगाव मायनर या नावाने नहरांची निर्मिती करण्यात आली आहे. डावा कालवा या मुख्य कालव्यावर महालगाव मायनरचे आऊटलेट तथा दरवाजा बांधकाम करण्यात आले आहे. या आऊटलेटचे बांधकाम दगडाचे असून लोखंडी दरवाजा तुटला आहे. दरम्यान, प्रथम टप्प्यातील पाणी वाटपात या आऊटलेट दगड कोसळली आहेत. या शिवाय लोखंडी दरवाजा तुटल्याने लाकडी ओडण्यांचा आधार देण्यात आलेला आहे. याच आऊटलेट वरुन वाहतुक सुरु राहत असल्याने कोणत्याही क्षणी आऊटलेट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे. दुसऱ्या टप्प्यात धान पिकाला पाणी वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शेतकरी पाणी सोडण्याची ओरड करीत आहेत. यामुळे या पाण्याच्या प्रवाह आणि वेगात आऊटलेट भुईसपाट होण्याचा अंदाज कार्यरत कर्मचारी व्यक्त करीत आहेत.या संदर्भात कार्यरत अमिन यांनी वरिष्ठांना या आऊटेटची माहिती दिली आहे. परंतु कुणी ऐकायला तयार नाहीत. सध्या पाणी वाटप बंद असताना यंत्रणेमार्फत या आऊटलेट व लोखंडी दरवाजाचे दुरुस्ती करण्याचे सौजन्य दाखविण्यात आले नाही. या आऊटलेटचे क्रांकीट करण्याचे वरिष्ठांनी निर्देश दिले असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु शाखा अभियंते प्रभारी असल्याने स्थिती जैसे थे आहे. सध्या स्थित मध्यम प्रकल्प चांदपूर जलाशयाचा प्रशासकीय कारभार सैरवैर आहे. डावा व उजवा कालवा अंतर्गत शाखा अभियंताचे पदे रिक्त आहेत. शाखा कारकुन, लिपीक आणि अमिन यांची पदे रिक्त असुन चतुर्थ क्षेणीतील तीन कर्मचारी १४ हजार हेक्टर आर शेतीला पाणी वाटपाचे नियोजन करीत आहेत. (वार्ताहर)