शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘फाल्टी’ विद्युत मीटरचा शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 22:36 IST

आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचा जबरदस्त फटका बसत आहे.

ठळक मुद्देपंप न वापरणाऱ्यांनाही बिले : ४० वर्षांपासून डागडुजी झालीच नाही

राहुल भुतांगे।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस्मानी संकटाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महावितरणचा जबरदस्त फटका बसत आहे.आष्टी जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या नाकाडोंगरी, आष्टी, लोभी, पाथरी, कवलेवाडा, पौनारखानी, चांदमारा, गणेशपूर, घानोळ, सुंदरटोला आदी गावांचा समावेश होतो. सदर गावे ही नदीकाठची गावे असून बहुतांश शेतकरी विहीरीवर कृषीपंपाद्वारे शेतीला सिंचन करतात. हांगामी धानपिक घेणारे शेतकरी कृषीपंपाचा उपयोग करीत नाही परंतू सर्वांकडे विद्युत मीटर असून त्याचा फटका शेतकºयांना बसत आहे. विद्युत मीटर ‘फाल्टी’ असल्यामुळे महावितरण विभागाचे समप्रमाणात विद्युत बिले येत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी शेतकऱ्यांवर कर्जाचे डोंगर वाढत आहे. आष्टी जिल्हा परिषद क्षेत्रात ४० वर्षापुर्वी टाकण्यात आलेले विद्युत तारे आजतागायत बदलण्यात आलेले नाही. किंवा त्यांची डागडुजी करण्यात आलेली नाही.परिणामी या क्षेत्रात कधीही वादळीवारा किंवा अतिउष्णतेमुळे त्या विद्युत तारा तुटत असल्याने विद्युत तारांनीही आता प्राण सोडले असल्याचे दिसून येत आहे. याचा सर्वाधिक फटका शाळा, दवाखाने, राईस मिल, व्यापारी संस्थाने व शेतकऱ्यांना बसत आहे. याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना अनेकदा तक्रारी केल्यात परंतु याकडे अधिकाºयांनीही लक्ष दिले नाही.भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे ऊर्जामंत्री आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी शेतकऱ्यांच्या किमान मुलभूत गरजांकडे जातीने लक्ष घालून शेतकºयांच्या जीवण मरणाचा प्रश्न तातडीने सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.या क्षेत्राचा प्रतिनिधी म्हणून अनेकदा महावितरणला तक्रारी केल्या परंतु तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आल्यामुळे आता थेट ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार केली आहे.- शिशुपाल गौपाले, पं.स. सदस्य आष्टीराज्य शासनाने अधिकाऱ्यांना मोकाट सोडले म्हणून शेतकरी व सर्वसामान्यांना असे दिवस पाहावे लागत आहे.-संगिता मुंगूसमारे, जि.प. सदस्या आष्टी.