शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धान्य न मोजण्याचा अधिकाºयांचा फतवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:02 IST

मागील अनेक वर्षापासून येथे दोन शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. विजयलक्ष्मी राईस मिल असोसिएशन व खरेदी विक्री संघाचा पारडी नावाने दिघोरीतच आधारभूत धान खरेदी केंद्र आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : शेतकºयांची व्यापाºयांकडे धाव, दिघोरीतील प्रकार

मुकेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कदिघोरी (मोठी) : मागील अनेक वर्षापासून येथे दोन शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र आहेत. विजयलक्ष्मी राईस मिल असोसिएशन व खरेदी विक्री संघाचा पारडी नावाने दिघोरीतच आधारभूत धान खरेदी केंद्र आहे. यावर्षी खरेदी-विक्री संघाने पारडी दिघोरी या नावाने असलेल्या गोदामात धान खरेदीचा शुभारंभ केला. मात्र या गोदामात फक्त पारडी येथीलच शेतकºयांच्या सातबारा असलेला धान खरेदी करावा, असा आदेश जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी दिला. यामुळे दिघोरीच्या शेतकºयांनी गोदामासमोर ठेवलेले धान्य उचलण्याची वेळ आली आहे.दुसरीकडे विजयलक्ष्मी राईस मिल असोसिएशनचा दिघोरी नावाने गोदाम अजुनही सुरू न झाल्याने मळणी झालेले धान कुठे विकावे असा प्रश्न दिघोरीच्या शेतकºयांना पडला आहे. मागीलवर्षी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामाच्या वेळी लक्ष्मी राईसमिल असोसिएशनला दिघोरीत गोदाम न मिळाल्यामुळे त्यांनी बारव्हा येथे दिघोरी नावाने धान खरेदी केंद्र सुरू केला.परंतु बारव्हा हे अंतर १० कि़मी. असल्याने दिघोरीच्या कोणत्याच शेतकºयांने बारव्हा येथील धान खरेदी केंद्रावर धान दिले नाही. यावर्षीसुद्धा विजयलक्ष्मी राईस मिल असोसिएशनला दिघोरीत गोदाम मिळण्याची आशा धूसर दिसत आहे. तसेच पारडी दिघोरी नावाने सुरू असलेल्या गोदामात दिघोरीचे धान खरेदी न करण्याचा फतवा जिल्हा मार्केटिंग अधिकाºयाने काढला असल्याने दिघोरीच्या शेतकºयांमध्ये असंतोष पसरत आहे.दिघोरी येथील शेतकºयांनी बाहेरगावच्या गोदामात जावून धान विकावे व गावातील गोदामात विकू नये हा कुठला न्याय आहे. दिघोरीला कायमस्वरूपी गोदाम देण्याची मागणी दिघोरी व परिसरातील शेतकºयांनी केली आहे.एका गावाच्या नावाने दोन खरेदी केंद्र देता येत नाही. दिघोरीतील धान खरेदी फक्त एकाच गोदामात केली जाईल. दिघोरी नावाने विजयलक्ष्मी राईसमिल केंद्र चालवित होते. त्यांना याबाबत रितसर नोटीस देण्यात येईल. गोदाम सुरू करण्यासाठी त्यांना किमान आठ दिवसांची मुदत देण्यात येईल तोपर्यंत म्हणजेच जवळपास दिघोरी येथे तोडगा निघल्याशिवाय १० ते १२ दिवसांपर्यंत धान मोजता येणार नाही.-गणेश बर्वे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.दरवर्षी दिघोरी पारडी या नावाने सुरू असलेल्या गोदामात दिघोरीच्या शेतकºयांचे धान खरेदी करीत होते. मात्र यावर्षी जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी आमच्या दिघोरी पारडी नावाने सुरू असलेल्या केंद्रात दिघोरीचे धान खरेदी करू नये, असे सांगितले आहे. यावर जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांना मार्ग सांगण्यात आले. यात अजून एक खाली गोदाम आहे. त्यामुळे गोदाम दिघोरी केंद्र या नावाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, पुढील उत्तर आल्यावर अंमलात आणली जाईल.-अरुण गभने, उपाध्यक्ष, खरेदी विक्री संघ.जिल्हा मार्केटिंग अधिकाºयांनी दिघोरीच्याच गोदामात दिघोरीचे धान खरेदी न करण्याचा जो ओदश दिला, हा अत्यंत संतापजनक आहे. या आदेशामुळे शेतकºयांनी शेतात केलेल्या मेहनतीचा अपमान झाला. पुढील दोन दिवसात दिघोरीच्या शेतकºयांचे धान खरेदी न केल्यास शेतकरी जन आंदोलन उभारून दिघोरीचे धान दिघोरी येथील गोदामात खरेदी करण्यास भाग पाडू.-रवी हटवार, अध्यक्ष राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळ.