शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

बैलाऐवजी टॅ्रक्टरचा पोळा

By admin | Updated: August 27, 2014 23:17 IST

शेतात राबणाऱ्या बैलांचे काम आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागले आहे. त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. बहुतांश गावात बैल दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात बैलच नसेल तर

जिल्ह्यात चर्चा : कुशारीवासीयांचा अभिनव उपक्रममोहाडी : शेतात राबणाऱ्या बैलांचे काम आता ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागले आहे. त्यामुळे बैलांची संख्या कमी झाली आहे. बहुतांश गावात बैल दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात बैलच नसेल तर पोळा कसा साजरा करायचा, या विचाराने चिंतित भंडारा जिल्ह्यातील कुशारी गावातील शेतकऱ्यांनी ‘बैल नाही तर काय झाले ट्रॅक्टर तर आहे ना’ असा विचार करुन ट्रॅक्टरलाच सजवून ट्रॅक्टरचा पोळा साजरा केला. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील कुशारी गावातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात. त्यासाठी प्रत्येकच शेतकऱ्यांजवळ ट्रॅक्टर आहे. ते शेतीही ट्रॅक्टरच्या सहाय्याने करतात. त्यामुळे या गावात ट्रॅक्टरची संख्या अधिक आहे. अशा स्थितीत बैलच नाही तर पोळा कसा साजरा करायचा. असा प्रश्न समोर आल्यानंतर कुशारी येथील शेतकऱ्यांनी त्यावर पर्याय शोधून मंगळवारला ट्रॅक्टरचा पोळा साजरा केला. अडीच हजार लोकवस्तीच्या कुशारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात मंगळवारला सायंकाळी ५० शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर सजवून पोळ्यात सहभागी झाले. त्यानंतर विधीवत पुजा करण्यात आली. ट्रॅक्टरला पुष्पहार टाकून फटाके फोडून पोळा फोडला. उत्कृष्ट ट्रॅक्टर सजावटीला बक्षिसेही देण्यात आले.कुशारी येथील दिगांबर गभने यांच्या उपस्थितीत ट्रॅक्टरधारक शेतकरी अरविंद भिवगडे, गौरीशंकर गायधने, विवेक दिपटे, रामू गायधने, हर्षल गभने यांच्या पुढाकाराने या पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, आयोजकांनी कुशारीत यापुढे दरवर्षी ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात येईल, असे सांगितले. (शहर प्रतिनिधी)